BREAKING | गँगस्टर विकास दुबेचं कानपूरमध्ये एन्काऊंटर

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 जुलै 2020

विकास दुबेला कानपूर कोर्टात हजर केलं जाणार होतं. मात्र उज्जेनहून त्याला कानपूरला आणतेवेळी स्पेशल टास्क फोर्सच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला.

उत्तर प्रदेशमधील नंबर एकचा कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्कारऊंटरमध्ये मारला गेलाय. कानपूरमधील पोलिसांच्या हत्येप्रकरणात विकास दुबे हा प्रमुख आरोपी होता. कालच त्यानं सरेंडर केलं होतं. दरम्यान, आज उज्जैन हून त्याला कानपूरलं आणलं जात होतं. त्यावेळी हा सगळा थरारक प्रकार घडलाय.  आज विकास दुबेला कानपूर कोर्टात हजर केलं जाणार होतं. मात्र उज्जेनहून त्याला कानपूरला आणतेवेळी स्पेशल टास्क फोर्सच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला.

 

 

 

यानंतर विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली... पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं.यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. एन्काउंटरनंतर त्याचा मृतदेह हॅलेट रुग्णालयात आणण्यात आला. तसंत अपघातात जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुख्यात गुंड विकास दुबेला काल मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बेड्या ठोकल्या. 8 पोलिसांचं हत्याकांड केल्यानंतर फरार झालेल्या विकास दुबेचा पोलिस आठवड्या भरापासून शोध सुरू होता. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live