Breaking | देवाचं दर्शन घडणार पण.....

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 5 जून 2020

देशभरात गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेला लॉकडाऊन आता टप्याटप्याने उघण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने अनेक सार्वजनिक ठिकाणे पुन्हा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यात देशभरातील धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. भारतातील धार्मिक स्थळे ही कायमच तेथे होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे ओळखली जातात. पण, लॉकडाऊन शिथिलतेनंतर धार्मिक स्थळांचे स्वरुप बदलणार आहे. या बदललेल्या स्वरुपाची नियमावली केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केली. 

नवी दिल्ली :अखेर केंद्र सरकारकडून गुरुवारी धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये धार्मिक स्थळी मास्क आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक आहे. याचबरोबर धार्मिक स्थळी प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, दोन भाविकांमध्ये निदान 6 फुटाचे अंतर राखणे अनिवार्य असणार आहे.देशातील सर्वच प्रसिद्ध धार्मिक स्थळे ही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून भाविकांसाठी 25 मार्चपासून बंद करण्यात आली होती. पण, आता अनलॉक वन अंतर्गत देशातील अनेक राज्यात सार्वजनिक व्यवहारांना काही अटी शर्थी घालून पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. यात धार्मिक स्थळे भाविकांसाठी पुन्हा उघडण्याचाही समावेश आहे. याबाबत अनेक राज्यांकडून केंद्र सरकारकडे नियमावली जाहीर करण्याची मागणी होत होती. 
देशभरात गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेला लॉकडाऊन आता टप्याटप्याने उघण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने अनेक सार्वजनिक ठिकाणे पुन्हा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यात देशभरातील धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. भारतातील धार्मिक स्थळे ही कायमच तेथे होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे ओळखली जातात. पण, लॉकडाऊन शिथिलतेनंतर धार्मिक स्थळांचे स्वरुप बदलणार आहे. या बदललेल्या स्वरुपाची नियमावली केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केली. 

फक्त कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीच धार्मिक स्थळी जाऊ शकतात. तसेच त्यांनी आत जाण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुणे अनिवार्य आहे. याचबरोबर सार्वजनिक प्रार्थना बैठक व्यवस्था, चटई शक्यतो टाळण्यात यावी, भाविकांनी त्यांची स्वतःची चटई आणावी असेही आवाहन करण्यात आले आहे. 
तसेच मंदिरातील मुर्ती, पवित्र पुस्तकाला हात लावण्यासही मनाई आहे. याचबरोब प्रसाद वाटप आणि पवित्र पाण्याचा छिडकाव करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच भजनाचे, भक्तीगीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी आहे. शक्यतो रेकॉर्डेड भक्तीगीते लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने धार्मिक स्थळाच्या प्रशासनाला भाविकांची संख्या सिमित ठेवण्यास सांगितले आहे. 

WebTittle::Breaking | God's vision will happen but .....

संबंधित बातम्या

Saam TV Live