BREAKING | खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वे!

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 2 जुलै 2020

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या या प्रस्तावाबाबत ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या निर्मितीचे काम भारतातच होणार आहे. ज्या कंपन्यांना हे काम देण्यात येईल त्या कंपन्यांना वित्तपुरवठ्यापासून ते खरेदी कामकाज आणि देखभालही करावी लागणार आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी ट्रेन चालविण्याचे आमंत्रण खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. खासगी युनिट्सला आपल्या नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी देण्याची योजना रेल्वेने बुधवारी औपचारिकरित्या सुरू केली. त्याअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने १०९ मार्गावर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागवलेत. खासगी क्षेत्रातून सुमारे ३०,००० कोटींची गुंतवणूक असल्याचे रेल्वेत होणारे.
गेल्या वर्षी आयआरसीटीसीने लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस ही पहिली खासगी ट्रेन सुरू केली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कमी खर्चात देखभाल करणे, भारतीय रेल्वेमध्ये कमी कालावधीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ करणे, उत्तम सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी रेल्वेमध्ये खासगीकरण केलं जात असल्याचं सांगितलं जातंय. 

 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या या प्रस्तावाबाबत ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या निर्मितीचे काम भारतातच होणार आहे. ज्या कंपन्यांना हे काम देण्यात येईल त्या कंपन्यांना वित्तपुरवठ्यापासून ते खरेदी कामकाज आणि देखभालही करावी लागणार आहे.

 

सरकारकडून कंपनीला ३५ वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार असून त्याअंतर्गत खासगी कंपनीला रेल्वेला निश्चित रक्कम आणि विजेचे शुल्क द्यावे लागणार आहे. त्यानुसारच एकूण महसुलाची विभागणी करण्यात येणार आहे.

या साठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्र सरकार हे पाऊल उचलून आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीचा येणारा मोठा खर्च कमी करणे हा उद्देश साध्य करत आहे. या मुळे ट्रान्झिट टाइमदेखील कमी होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त यामुळे देशातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना योग्य ती सुरक्षा पुरवून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणेही शक्य होणार आहे. प्रवासी गाड्या चालण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा रेल्वेचा हा पहिलाच उपक्रम आहे.

केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकणे सुरू केले असून देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

WebTittle :: BREAKING | Indian Railways moving towards privatization!


संबंधित बातम्या

Saam TV Live