BREAKING | मुंबईचा राजा फक्त चार फुटाचा

BREAKING | मुंबईचा राजा फक्त चार फुटाचा

राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक भान जपण्याचा निर्णय घेतला आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' नंतर आता गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानेही असाच स्तुत्य निर्णय घेतला आहे.करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मुंबई पोलीस व महापालिकेनेही मंडळांना तशी विनंती केली होती.

भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता मंडळाच्या वर्गणीतून सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे तसेच गरजूंकरिता रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.'चिंचपोकळीचा चिंतामणी' मंडळाने याआधीच १०० वर्षांची परंपरा खंडित करून श्रींचा आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पाटपूजनाचा कार्यक्रम मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती करण्याचं ठरवलं आहे.

मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'ला याबाबत सविस्तर माहिती दिली. 'मुंबईचा राजा'च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी मंडळातर्फे घेतली जाणार आहे. दर्शनार्थींना आरोग्य प्रशासनाने ठरवून दिलेले शारीरिक अंतराचे नियम पाळावे लागतील. त्यांना सॅनिटाइजर उपलब्ध करून दिले जाईल. मंडळ ही सगळी काळजी घेणार आहे, असं तावडे यांनी सांगितलं.

केवळ पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यंदा केली जाणार असून ही मूर्ती शाडूची असेल. मूर्तीचं विसर्जनही कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. भाविकांसाठी 'लाइव्ह दर्शन'ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असा निर्णय मंडळाच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' हा भव्यदिव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. 'मुंबईचा राजा'ची मूर्ती सुमारे २२ फुटांची असते. यंदा मंडळानं सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्तीची उंची चार फुटांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

WebTittle | BREAKING | The king of Mumbai is only four feet tall


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com