BREAKING | वाचा पाकिस्तामधून धमकीचा फोन

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 30 जून 2020

काल कराचीमधल्या शेअर बाजारात हल्ला झाला. आता ताज हॉटेलवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई: २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करू. आमचे सदस्य ताज हॉटेल बॉम्बनं उडवतील, अशी धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली. रात्री साडे बाराच्या सुमारास हा कॉल आला होता. तो ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यानं उचलला. रात्रीच्या सुमारास ताज हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या कराचीमधून धमकीचा कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं आपण लष्कर-ए-तोयबा संघटनेचे सदस्य असल्याचं सांगितलं. त्यानं ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. याची माहिती पोलिसांना मिळताच हॉटेल परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

 

 

 

 

वांद्र्यातील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये धमकीचा दुसरा फोन आल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. या हॉटेलमध्ये कॉल केलेल्या व्यक्तीनंदेखील तशीच धमकी दिली. हे दोन्ही कॉल एकाच नंबरवरून करण्यात आले होते. ताज आणि ताज लँड्स एन्ड ही दोन्ही हॉटेल्स सध्या कोरोनामुळे बंद आहेत. मात्र या दोन्ही हॉटेलबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत पोलिसांकडून वाढ करण्यात आली आहे. सध्या सायबर सेलकडून याचा तपास सुरू आहे. धमकीचे कॉल नेमके कुठून आले, याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी दूरसंचार विभागांची मदतही घेतली जात आहे.

 

 

 

 

काल कराचीमधल्या शेअर बाजारात हल्ला झाला. आता ताज हॉटेलवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराचीमधून धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेल परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

WebTittle : BREAKING | Read threatening phone calls from Pakistan


 

संबंधित बातम्या

Saam TV Live