वाईटाच्या संकटात सर्वात चांगली बातमी! फायझर लशीच्या नावाने चांगभलं

साम टीव्ही
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

 

  • फायझर लशीच्या नावाने चांगभलं
  • ब्रिटन लसीकरण करणारा जगातला पहिला देश
  • वाईटाच्या संकटात सर्वात चांगली बातमी

अखंड मानवजातीला जेरीस आणणाऱ्या कोरोनाविरोधातील लशी अंतिम टप्प्यात असताना तिकडे. ब्रिटनमधून एक चांगली बातमी हाती आलीय. सात-आठ महिन्यांपासून होरपळलेल्या प्रत्येक जीवाला ही बातमी दिलासा देईल. पाहूयात. 'साम टीव्ही'च्या चांगभलं या विशेष उपक्रमातून.

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या जगासाठी ब्रिटनमधून सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आलीय. फायझरने विकसित केलेल्या लशीला ब्रिटनने मंजुरी दिल्यामुळे लवकरच ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू होणारेय. फायझर कंपनीने विकसित केलेली लस जगात पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये उपलब्ध होणारेय.

फायजरने विकसित केलेली करोना लस ९० टक्क्यांहून जास्त प्रभावी असल्याचा दावा करण्यात येतोय. फायझर आणि जर्मनीच्या बायोएनटेकने ही लस संयुक्तपणे विकसित करण्यात आलीय. फायझरची ही लस कोरोना विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा करण्यात आला असून, फायझरची ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, वर्षभरानंतर पुन्हा एकदा ही लस घ्यावी लागणार असल्याचं सांगितलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे, ब्रिटनमध्ये लशीचे तातडीने 10 कोटी डोस उपलब्ध करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या राक्षसाने जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे त्याचा खात्मा करण्यासाठी जगभरातून लशी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतासह अनेक देशांच्या लशी दृष्टिक्षेपात असतानाच फायझरने त्यात मोठी आघाडी घेतलीय. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा खात्मा करण्याची सुरूवात ब्रिटनमधून सुरू होतेय. ही खरंतर दीर्घकाळ चाललेल्या वाईटातली सर्वात चांगली बातमी म्हणावी लागेल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live