बहिणीला त्रास दिल्याच्या कारणावरून भावाने केली मेहुण्याची हत्या !

अभिजित घोरमारे
शनिवार, 5 जून 2021

माझ्या बहिणीला का त्रास देतो असे म्हणत आरोपीने बहिणीच्या पतीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. 

भंडारा - भंडारा Bhandara शहरातील टप्पा मोहल्ला परिसरात असणाऱ्या झोपडपट्टी येथे बहिणीला वारवांर त्रास देत असल्याच्या कारणाने चक्क आपल्याच बहिणीच्या पतीची हत्या Murder केल्याची घटना समोर आली आहे. Brother kills Brother-in-law for harassing sister

हि घटना रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे. मंगल अमर मोगरे वय 30 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तर सुशिल संदेश असे आरोपीचे नाव असून भंडारा शहर पोलिसांकडून Police आरोपीला अटक Arrest करण्यात आली आहे. 

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्याला पुन्हा दिली ब्लू टिक !

भंडारा शहारातील बस स्टॉपच्या मागील परिसरात असणाऱ्या कस्तुरबा गांधी वॉर्ड येथील रहिवाशी मंगल अमर मोगरे वय 30 (मुळ राहणार राजनानगाव) हा घरी एकटा असताना आरोपी सुशिल संदेश हा मंगल याच्या घरी आला व तु नेहमी माझ्या बहीणीला का त्रास देतो असा प्रश्न करत भांडण करू लागला. 

हे देखील पहा -

वाद विकोपाला गेल्यावर घरी एकटा असलेल्या मंगल मोगरे याच्यावर आरोपीने धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. व घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी मंगल मोगरे याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

हत्या करणारा आरोपी सुशील संदेश याला पोलीसांनी अटक केली असुन घटनेचा पुढील तपास भंडारा शहर पोलिस करीत आहेत. Brother kills Brother-in-law for harassing sister

Edited By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live