नात्याला काळिमा; दिराने केला वहिनीवर बलात्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

नांदेड : शेती कामाला गेलेल्या भावजयीवर दिरानेच बलात्कार केल्याची घटना मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दितील भुतनहिप्परगा येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून चुलत दिरासह त्याच्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना मौजे भुत्तनहिप्परगा शिवारात घडली. 

नांदेड : शेती कामाला गेलेल्या भावजयीवर दिरानेच बलात्कार केल्याची घटना मरखेल पोलिस ठाण्याच्या हद्दितील भुतनहिप्परगा येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून चुलत दिरासह त्याच्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना मौजे भुत्तनहिप्परगा शिवारात घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे भुतहिप्परगा येथील पीडित महिला (वय 21) ही मे महिन्यामध्ये शेतातील कणिस वेचण्यासाठी गेली असता चुलत दिर विजय उर्फ अशोक व्यंकट उटकुरे याने आसपास कुणीच नसल्याची संधी साधून पिडीतेस शेतातील झुडपात नेऊन बळजबरीने अतिप्रसंग केला. घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पिडीतेने सायंकाळी घडलेल्या प्रकाराची माहिती आरोपीची आई सरुबाई व्यंकट उटकुरे व वडिल व्यंकट पिराजी उटकुरे यांना दिली. मा आरोपीचे आई वडीलांनी हा आमच्या कुटुंबाच्या अब्रुचा प्रश्न आहे. आम्हाला सांगितलेली माहिती कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही म्हणून धमकी दिली. त्यानंतर पिडीतेने बाहेरगावी कामासाठी गेलेल्या पतीला झालेला प्रकार सांगितला. परंतु भितीपोटी पतीनेही तक्रार करण्यास नकार दिल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाल्याने सदरील पीडितेने घटस्फोट घेऊन वडिलांचा आधार घेतला. दरम्यान रविवारी (ता. 20) मरखेल ठाणे गाठून पीडितेने रीतसर तक्रार दिली आहे.

पिडितेच्या जबाबावरुन आरोपी विजय उर्फ अशोक उटकुरे, व्यंकट पिराजी उटकुरे, सरुबाई व्यंकट उटकुरे रा.भुतनहिप्परगा (ता.देगलूर) यांच्या विरुद्ध मरखेल पोलिसांनी कलम 376 (2) एन, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड त्यांचे सहकारी परशुराम ईंगोले, मोहन कणकवळे, रवींद्र भूले हे करीत आहेत.

Web Title: brother in law rapes sister in law


संबंधित बातम्या

Saam TV Live