कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत - राज्यपाल कोश्यारी

Governor Koshyari
Governor Koshyari

बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट

मुंबई - कोरोनाच्या Covid-19 संकटकाळात भगवान बुद्धांची Lord Buddha करुणा आमच्या सोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र् Maharashtra राज्याचे राज्यपाल Governor महामहिम भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल Governor यांची भेट घेऊन सुंदर बुद्ध मूर्ती Buddha Statue सप्रेम भेट दिली. या वेळी कमानी ट्युबसच्या बुद्ध पौर्णिमा कॅलेंडरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Buddha's compassion with us during the crisis of Corona - Governor Koshyari)

हे देखिल पहा - 

शांती शिवाय विकास  नाही. भगवान बुद्धांचा धम्म हा समतेवर  आधारित आहे.शांती अहिंसा करुणा या तत्वांवर आधारलेला बौद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगात सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिला याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब आज  26  मे 2021 रोजी सकाळी 11:00  वाजता विश्वशांती दुत, तथागत गौतम बुध्द यांच्या 2456 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.भगतसिंगजी कोश्यारी यांची राजभवन येथे शुभेच्छा भेट घेण्यात आली.

रामदासजी आठवले यांच्या वतीने बुध्दांची मूर्ती भेट देण्यात आली. या प्रसंगी बौध्द धर्मगुरु भिक्खुंना चिवरदान करण्यात आले. यावेळी भन्ते विररत्न, भन्ते कश्यप, मा.कल्पना सरोज, मा.आशिष देशपाडे, मा.घनश्याम चिरणकर, मा.प्रविण मोरे आणि मा.महेश लंकेश्वर उपस्थित होते.

Edited By - Puja Bonkile

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com