Budget 2019 : राहुल गांधी म्हणाले, डिअर नमो...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डिअर नमो म्हणतानाच आखरी जुमला बजेट असा हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटवर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

नवी दिल्लीः काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डिअर नमो म्हणतानाच आखरी जुमला बजेट असा हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटवर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, अशी घोषणा केली. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार आहे. 2 हेक्‍टर जागा असलेल्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात हे पैसे दिले जातील. या योजनेसाठी केंद्र सरकारने वर्षाला 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये व दिवसाला 17 रुपये शेतकऱयाला मिळणार आहेत. अल्पभूधारक शेतकऱयांना दिवसाला 17 रुपये देऊन अपमान केला आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear NoMo,

5 years of your incompetence and arrogance has destroyed the lives of our farmers.

Giving them Rs. 17 a day is an insult to everything they stand and work for. #AakhriJumlaBudget

— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2019

Web Title: Budget 2019 farmers rs 17 A Day An Insult says Rahul Gandhi


संबंधित बातम्या

Saam TV Live