ब्राम्होस, एआरव्हीच्या खरेदीसाठी 3 हजार कोटी रूपये मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 डिसेंबर 2018

लष्करी साहित्य खरेदीच्या 3 हजार कोटींच्या व्यवहारासाठी संरक्षण मंत्रालयाने शनिवारी (ता. 1) मंजुरी दिली. व्यवहारात नौदलाच्या दोन स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रे व अर्जुन रणगाड्य़ासाठी एआरव्ही गाड्या विकत घेण्यात येणार आहेत. खरेदीला मंजुरी मिळाल्याची माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. 

ही बैठक संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारत एक अब्ज डोलरला रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहेत. ब्राम्होस हे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत व रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. 

भारतीय लष्कराचा रणगाडा अर्जुनसाठी एआरव्ही गाड्या विकत घेण्याला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. एआरव्ही गाडी डीआरडीओने विकसित केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live