उद्योगविश्वासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय? 7 मेगा इन्व्हेस्टमेंट पार्कमधून नेमकं काय साधणार? यासह वाचा सविस्तर माहिती

साम टीव्ही
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021
  • उद्योगविश्वासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय?
  • कोरोनामुळे रुतलेलं उद्योगचक्र फिरणार का?
  • उद्योगांना अर्थसंकल्पातून मदतीचं इंधन मिळालं का?

कोरोनाच्या संकटात ठप्प असलेल्या उद्योग विश्वाला, अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पाहूयात, अर्थसंकल्पानं उद्योगांसाठी नेमक्या काय तरतुदी केल्यायत.

कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगातील उद्योगांची चाकं ठप्प होती. आता लस आलीय आणि अनलॉकही जाहीर झालंय. त्यामुळे अनेक महिने बंद असलेली उद्योगांची चाकं फिरू लागलीयत. मात्र, मोठ्या टाळेंबदीमुळे झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी उद्योगांना सरकारी मदतीची गर होती. म्हणूनच, अर्थसंकल्पाकडे संपूर्ण उद्योग जगताचं लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्पात उद्योग विश्वासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

जस की देशभरात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. उद्योगांना उभारी मिळावी म्हणून, डीएफआयसाठी ३ वर्षांकरिता ५ लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. त्याचसोबत, कापड उद्योगासाठी येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्याच येणारेय. लघु उद्योगांतील असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टलही निर्माण करण्यासोबतच लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूदही करण्यात आलीय. कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिगवर काम सुरु करण्यात येणार आहे.

ही सगळी परिस्थिती पाहता, कोरोनामुळे उद्योगविश्वाचा पदर फाटलाय. त्याला ठिगळ लावण्याचा प्रयत्न सरकारने अर्थसंकल्पातून केलाय. पण त्यातून खरंच उद्योग जगताला पुन्हा उभारी मिळेल का? हे येणाऱ्या काळातच समोर येईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live