वाचा, दशकातल्या पहिल्या अर्थसंकल्पाने शेतीला काय दिलं? या घोषणांच्या पेरणीमुळे शेती क्षेत्र बहरणार का?

वाचा, दशकातल्या पहिल्या अर्थसंकल्पाने शेतीला काय दिलं? या घोषणांच्या पेरणीमुळे शेती क्षेत्र बहरणार का?

या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर झालाय. इतकंच नाही तर, कोरोनाच्या संकटातील हा पहिला अर्थसंकल्प असल्यानं त्यात विविध क्षेत्रांसाठी नेमक्या काय तरतुदी असणार आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आपण या सविस्तर रिपोर्टमधून पाहणार आहोत, शेतीसाठी या अर्थसंकल्पानं नेमकं काय दिलं?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर केलाय. भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. खरंतर, कोरोनाने लोकांच्या आरोग्याशी खेळ तर मांडलाच, पण सर्वच पातळ्यांवर आर्थिक कंबरडंही मोडलं गेलं. म्हणूनच हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, संपूर्ण जग ठप्प असताना शेतीक्षेत्र मात्र अविरत सुरूच होतं. वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतमाल शेतातच सडून गेला, तरीही बळीराजानं न खचता मातीतून अन्न-धान्याचं सोनं पिकवलंच. म्हणूनच या अर्थसंकल्पातून शेतीच्या पदरात काय पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे अर्थसंकल्पातून शेतीसाठी काय मिळालं... यावर एक नजर टाकूयात.

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं असून, गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींची मदत करण्यात आलीय. त्याचसोबत, १६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचं ध्येयही सरकारने ठेवलंय. शेतमालाची नियोजनबद्ध विक्री होण्यासाठी १ हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. शेतीला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूदही करण्यात आलीय. विजेची बचत करण्यासाठी 20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप पुरवण्याचीही घोषणा करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत रासायनिक खतं टाळण्यासाठी जनजागृतीही करण्यात येणारेय. शेतकऱ्याच्या पतवाढीसाठी किसान क्रेडिट कार्ड सिस्टीमही उभारण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच माध्यमातून झीरो बजेट शेतीसाठीही सरकार प्रयत्न करणारेय. किनारी भागात मत्स्य व्यवसायाला चालना देत, दूध, मांस, माशांसाठी किसान रेल्वे चालवण्यात येणारेय. त्याचसोबत, दुधाचे उत्पादन वाढण्यासाठीही विशेष योजना आणल्या जाणार आहेत.

अर्थसंकल्पातून शेतीसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या घोषणांची अंमलबजावणी कशी होते? शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरून या योजना खरेच शेतीत झिरपतील का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच ठरवणारेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com