कोरोनाने केले लाखो भाविकांचे सैलानिकडे जाणारे मार्ग बंद

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथील यात्रा यावर्षी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रद्द करण्यात आली. दरवर्षी या यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. परंतु यावर्षी कोरोना वाढीमुळे पोलीस प्रशासनाने भाविकांनी या परिसरात येऊ नये असे आवाहन केले. 

बुलढाणा : जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथील यात्रा यावर्षी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रद्द करण्यात आली. दरवर्षी या यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. परंतु यावर्षी कोरोना वाढीमुळे पोलीस प्रशासनाने भाविकांनी या परिसरात येऊ नये असे आवाहन केले. भाविकांना येथे येण्यापासून रोखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त सैलानी गाव व दर्गा परिसरात लावण्यात आला आहे. (The Buldhana administration canceled the Sailani Baba Yatra)

सैलानिकडे जाणाऱ्या सर्व मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दरवर्षी याठिकानी होळी निमित्त लाखो नारळाची होळी करण्यात येते या कार्यक्रमाला आंध्रप्रदेश , मध्यप्रदेश , तेलंगणासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी हि यात्रा रद्द झाली असून कोणीही सैलानी येथे येऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हे देखिल वाचा - लाॅकडाऊनच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस रस्त्यावर

बुलढाणा (Buldana) शहराची  स्तिथी पाहताना जिल्ह्यात कोरोनाचा भड़का उडाला असून आज 903 बाधित रुग्ण असल्याने कोरोना संक्रमण वाढलेले दिसत आहे. तसेच इतर गावांची  कोरोना संख्या पाहताना बुलढाणा 146, खामगाव 153, मेहेकर 103, नांदुरा 104, मलकापुर 93 याप्रमाणे सर्व ठिकाणी रुग्ण आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. (The Buldhana administration canceled the Sailani Baba Yatra)

या आकडेवारीमुळे प्रशासन अद्याप गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे , जिल्ह्यातील तेराही तालुक्यात नागरिकांची ठिकठिकाणी मोठी गर्दी दिसून येते आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जातात. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झालेला आहे.  आता जिल्हा प्रशासन यावर क़ाय कड़क भूमिका घेतील याकडे जिल्हवासियांचे लक्ष लागले आहे. 

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live