दीड शहाण्यांकडून बैलाचा वाढदिवस, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

साम टीव्ही
शुक्रवार, 12 मार्च 2021

दीड शहाण्यांकडून बैलाचा वाढदिवस 
बैलाचा वाढदिवस करताना अतिशहाणपणा
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, आयोजकांवर गुन्हा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बैलाचा वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दीखोर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डोंबिवलीच्या मोठा गावात चक्क बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केक हा बैलाच्या आहाराचा भाग नाही. तरीही बैलाला केक भरवण्यात आला. प्राण्यांवर प्रेम करणं गैर नाही. पण कोरोनाकाळात बैलाचा वाढदिवस साजरा करताना आयोजकांना कोरोनाचा विसर पडला. बैलाचे मालक किरण म्हात्रे यांनी लोकांची गर्दी गोळा केली. गर्दीतल्या एकाही माणसाच्या तोंडावर मास्क नव्हता. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी किरण म्हात्रेवर गुन्हा दाखल 

मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे.पण मुक्य़ा प्राण्यांवरील प्रेमाचं औंगळवाणं प्रदर्शनाचं समर्थन करताच येणार नाही.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live