रेल्वेत परीक्षेविना बंपर भरती, वाचा काय आहेत अटी शर्थी...

साम टीव्ही
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

रेल्वेत परीक्षेविना बंपर भरती केली जाणाराय. रेल्वेत 4499 जागांसाठी मेगा भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झालीय. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहे.

सध्या कोरोनाच्या काळात नोकरीवर मोठं संकट आलंय. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या यात गेल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य होत नसल्याने सरकारही हतबल आहे. मात्र अशातच जरा आशेचा किरण दिसायला लागलाय. दरम्यान बेरोजगारांसाठी एक चांगली बातमी आहे,

रेल्वेत परीक्षेविना बंपर भरती केली जाणाराय. रेल्वेत 4499 जागांसाठी मेगा भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झालीय. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ -

अर्ज भरण्यासाठी दहावीला कमीत कमी 50 टक्के मार्कची अट असून, त्यासोबत आयटीआयही गरजेचं आहे. आरक्षित वर्गांसाठी आणि महिलांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर इतर वर्गांसाठी 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live