बुमराह अडकला विवाह बंधनात ....पाहा कोणासोबत केल लग्न ?
हार्दीक पांड्या ,युझवेंद्र चहल आणि विराट अनुष्काच्या गोड बातमीनंतर आता भारतीय क्रिकेट विश्वातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह हा विवाह बंधनात अडकला आहे.
हार्दीक पांड्या ,युझवेंद्र चहल आणि विराट अनुष्काच्या गोड बातमीनंतर आता भारतीय क्रिकेट विश्वातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह हा विवाह बंधनात अडकला आहे.
सोशल मिडियावर त्याच्या लग्नाविषयी नेटकऱ्यांनी बरीच चर्चा रंगवली होती .पहिले साऊथची हिरोईन अनुपमा परमेश्वरन हिच्यासोबत बुमराहाच लग्न होण्याची बातमी सोशल मीडियावर पाहायला मिळत होती .पण ती बातमी खोटी ठरली असून बुमराह संजना गणेशनसोबत 14 मार्चला गोव्यात विवाहबंधनात अडकला आहे.
पण ही संजना गणेशन आहे तरी कोण ?
संजना गणेशन ही 28 वर्षाची असून ती क्रिकेट अँकर आहे. तीने बर्याच क्रिडा स्पर्धांमध्ये अँकरींग केली असून 2019 मधल्या ICC विश्वचषक ते इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला देखील होस्ट केले आहे. ती MTV च्या SPLITVILLA या कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाली होती .पण काही आरोग्यविषयक अडचणीमुळे तीने माघार घेतली .पण संजना आता कोलकत्ता नाईट रायडर्स या टीमसाठी होस्ट करते .तसेच तीने मॅाडेलींग क्षेत्रात सुद्धा बरेच काम केले आहे .
बुमराह आणि संजनाने त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र यांच्यासह खासगी कार्यक्रमात लग्न केले. त्यांच्या लग्नात कोरोनाचे सर्व नियम पाळले गेले .भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या चार कसोटी सामन्यांच्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहने आपले नाव मागे घेतले होते. ते या लग्नायाठीच. सध्या सोशल मिडियावर संजना आणि बुमराहचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत .त्यानी आपल्या सोशल अकांऊट वर लग्नाचा फोटो पोस्ट करुन "LOVE, if it finds worthly, directs your course".असा संदेश देत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे . त्यांच्या या फोटोवर कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांसोबत अनेक खेळाडुंनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .