धुळ्यात चार महिन्यांपूर्वी घरफोडी करणारा चोरटा अखेर जेरबंद  

भूषण अहिरे
बुधवार, 12 मे 2021

शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा दोंडाईचा पोलिसांनी शोध लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरीच्या रकमेतून संशयिताने मोटारसायकलसह सोने - चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

धुळे:  शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील ब्राह्मणे येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा दोंडाईचा पोलिसांनी Police शोध लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरीच्या रकमेतून संशयिताने मोटारसायकलसह सोने - चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुलाब आत्माराम सोनवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील सोने चांदीचे दागिने , रोख रक्कम असा ७ लाख २ हजार १७७ रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता . The burglar in Dhule was finally arrested by police

याबाबत गुलाब सोनवणे यांनी दोंडाईचा पोलिस Dondaicha ठाण्यात फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता . चार महिन्यांपासून येथील पोलीस अधिकारी तपास करत होते . मात्र चोरट्याचा काहीच तपास लागत नव्हता.

हे देखील पहा -

अखेर तब्बल चार महिन्यानंतर शिंदखेडा पोलिस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दाराकडून या चोरी संदर्भातील माहिती समोर आली. आणि मिळालेल्या माहिती नुसार पथक तयार करून शिंदखेडा येथील रथ गल्लीतून पवन कोमलसिंह गिरासे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. The burglar in Dhule was finally arrested by police

नर्स डेचे औचित्य साधत परिचारिकांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन

त्याची कसून चौकशी केली असता गिरासेने चोरीची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून या चोरट्यांकडून दोंडाईचा पोलिसांनी चोरलेल्या मुद्देमाल यापैकी एकूण ६ लाख २ हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल आणि २५ हजार रुपयांची जुनी मोटरसायकल असा ऐवज ताब्यात घेतला .

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live