
आयकर विभागानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ३१ जुलै २०२३ पर्यंत एकूण ६.७७ आयकर परतावा अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ६ कोटी आयटीआर पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेत. आतापर्यंत २.४५ कोटी करदात्यांना कर रिफंड करण्यात आलेत. तुम्हीही कर भरणारे असाल तर तुम्हाला रिफंड मिळालाय का? याची माहिती करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रिफंड स्टॅटेस तपासावे लागतील.(Latest News on business)
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी) नुसार, आयकर विभागानं वर्ष २०२३-२४ साठी आतापर्यंत पडताळी करण्यात आलेले ६.८४ कोटीमधील ६ कोटीपेक्षा जास्त करदात्यांचे रिटर्न प्रोसेस करण्यात आलेत. ५ सप्टेंबर२०२३ पर्यंत ६.९८ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. तर ६.७७ कोटी आयटीआर ३१ जुलैपर्यंत दाखल करण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानुसार दाखल करण्यात आलेल्या ६.९८ आयटीआरपैकी २.४५ कोटी करदात्यांना कर परतावा देण्यात आलाय. तर इतर करदात्यांनाही लवकरच रिफंड केली जाण्याची प्रक्रिया केली जातेय.
ज्या करदात्यांना आतापर्यंत कराचा परतावा मिळाला नाही. तसेच ज्या करदात्यांना परतावा मिळाला नाही, अशा लोकांनी कर रिफंड स्टेटस तपासून घ्यावं. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन स्टेटस तपासावे लागेल. दरम्यान जेव्हा आयकर विभागाकडून रिफंड दिला जातो. तेव्हा आयकर विभागाकडून नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर आणि इमेलवर माहिती दिली जाते.
दरम्यान जेव्हा करदात्यांकडून आयटीआरला व्हेरिफाय केलं जातं, तेव्हा आयकर विभाग कर रिटर्न करण्याची प्रक्रिया सुरू करते. करदात्याच्या बँक खात्यात कर रिफंड केलं जातं. करदात्यांच्या बँकखात्यात कर रिफंड होण्यासाठी साधारण ४ ते ५ आठवडे लागतात. तर काही प्रकरणात रिटर्न दाखल होण्यास ७ ते ८ दिवसाचा वेळ लागत असतो.
ऑनलाईन कर रिफंड स्टेटस तपासण्याची पद्धत
आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.inवर जावे लागेल.
आता आपला यूझर आयडी, पॅनकार्ड, आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
आता कर रिफंड पाहण्यासाठी पर्यायाला निवडावे लागेल.
यानंतर एक पर्याय निवडल्यानंतर आयकर रिटर्नवर क्लिक करावं लागेल.
आर्थिक वर्ष निवडून सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा कर रिफंड स्टेटस पाहू शकतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.