Airline Ticket Fare Expensive : प्रवाशांना झटका! सणासुदीत विमानाच्या तिकीटात वाढ, मोजावे लागतील जास्तीचे पैसे

Flight Ticket Fare : चेन्नई-मुंबई फ्लाइटचे भाडे या कालावधीत 56 टक्क्यांनी वाढून 5,600 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
Airline Ticket Fare Expensive
Airline Ticket Fare ExpensiveSaam TV

Airline Ticket Prices Up Festive Seasons :

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरु आहे. त्यानंतर अनेक सण उत्सव साजरे केले जातील. अशातच जर तुम्ही आतापासूनच विमानाचे तिकीट बूक करत असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील.

ट्रॅव्हल पोर्टल इक्सिगोच्या आकडेवारीनुसार, नवरात्रीच्या काळात काही ठिकाणांवरील विमानाच्या भाड्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे प्री-कोविड वर्ष २०१९ च्या तुलनेत या वर्षी विमानाच्या भाड्यात दुपट वाढ झाली आहे.

Airline Ticket Fare Expensive
Gold Silver Rate (19th September): सोन्याचा भाव कडाडला, चांदीतही तेजी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

नवरात्रीच्या (Navratri) पूर्वी बेंगळुरु- कोलकाता फ्लाइटचे सरासरी भाडे वर्षभरापूर्वी याच कालावधीत सुमारे ७००० रुपयांवरुन १४०० रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. त्याचप्रमाणे या काळात मुंबई-कोलकाता फ्लाइटचे (Flight) सरासरी भाडे ५५ टक्क्यांनी वाढून १२००० रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तर बेंगळुरु-पाटणा फ्लाइटचे सरासरी भाडे २५ टक्क्यांनी वाढून १०,००० रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

1. यंदा दिवाळीतही भाडेवाढ

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी (Diwali) असून या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत फ्लाइटच्या तिकीटात वाढ होणार आहे. दिवाळीच्या काळात अनेक मार्गावरील भाडे ७० टक्क्यांनी वाढेल असे म्हटले जात आहे. बेंगळुरु-मुंबई फ्लाइट ६७ टक्के महागणार त्यासाठी ५००० रुपये जास्तीचे पैसे मोजावे लागतील. बेंगळुरु-लखनऊचे भाडे ४१ टक्क्यांनी वाढून १०,००० रुपयांनी जास्तीचे वाढेल.

त्याचप्रमाणे चेन्नई-मुंबई फ्लाइटचे भाडे या कालावधीत 56 टक्क्यांनी वाढून 5,600 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. इज माय ट्रिपचे सीईओ आणि सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले की, येत्या सणासुदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत विमानाच्या भाड्यात ७२ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली ते अहमदाबाद या मार्गावर अधिक वाढ झाली असून अशातच दिल्ली ते श्रीनगर मार्गावर ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2. आगाऊ बुकिंग कसे कराल?

यंदा विमानाची आगाऊ बुकिंग करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. इक्सिगोच्या आकडेवारीनुसार नवरात्री आणि दिवाळीसाठी ३० दिवसांपूर्वी आगाऊ बुकिंग केली जाते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी जास्त असेल. इज माय ट्रिपवर ८० दिवसांपूर्वी तिकीट बुक करण्यात आले आहे.

Airline Ticket Fare Expensive
Hair Falls Remedies : केस गळून गळून पातळ झाले? हे ७ घरगुती उपाय करुन पाहाच, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

इक्सिगोचे सह-संस्थापक आणि ग्रुप Ceo आलोक बाजपेयी यांच्या मते, वाढती मागणी आणि मर्यादित क्षमतेमुळे, या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीसाठी आगाऊ बुकिंगचे भाडे गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 35-40 टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अधिक प्रमाणात तिकीट बुक केले जाईल अशी आशा आहे. यामध्ये गांधी जयंती, नवरात्री, ICC विश्वचषक 2023 आणि इतर सणांसह वीकेंडमुळे फायदा होऊ शकतो.

3. विमानाचा तिकीट दर का वाढला?

कोरोनानंतर विमान प्रवासातून सावरण्यासाठी भारत सध्या आघाडीवर आहे. गो फर्स्टने विमानसेवा स्थगित केल्यामुळे आणि विमानाचा तुटवडा, मागणी आणि पुरवठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाडे वाढले आहे. ऑगस्ट 2019 च्या प्री-कोविड कालावधीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये देशांतर्गत हवाई प्रवास 5.4 टक्क्यांनी वाढून 12.4 दशलक्ष झाला आहे. त्यामुळे भाडे 2019 च्या पातळीपेक्षा महाग राहिले आहे. मागणीपेक्षा कमी पुरवठा हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे पिटीने सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com