Apple iPhone15 नं लॉन्च होताच रचणार इतिहास, विकला जाणार पहिला 'मेड इन इंडिया' फोन!

Apple iPhone 15 Launch: भारतातील लोकांचं लक्ष घड्याळाच्या काट्याकडे लागलंय.
Apple iPhone15
Apple iPhone15saam Tv

Apple IPhone 15 Launch:

अ‍ॅपलच्या नव्या आयफोन १५ च्या लॉंचिंगला काही तास बाकी आहेत. घड्याळाच्या काट्याकडे भारतातील लोकांचं लक्ष लागलंय. कधी रात्रीचे साडेदहा वाजतात आणि कधी मोबाईल फोनची बुकिंग करतो, अशी अवस्था मोबाईल प्रेमींची झालीय. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे लॉन्चिंगच्या वेळी विकला जाणारा 'आयफोन १५' 'मेड इन इंडिया' असू शकतो. (Latest News on Technology)

भारतातील मोबाईल प्रेमींनी रात्री साडेदहा वाजण्याचा काउंटडाऊन सुरू केलाय. अ‍ॅपल आयफोनची लाँन्चिग होताच जगभरात याची विक्री सुरू होणार आहे. यावेळी आयफोन १५ हा लाँन्चिगसह दक्षिण आशियाई देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. परंतु इतर देशात खरेदीसाठी उपलब्ध होणारे आयफोन १५ हे चीनमध्ये बनण्यात आलेले असतील. भारतात असेंबल केलेला iPhone 15 लॉन्चच्या दिवशीही बाजारात उपलब्ध होणार आहे.

Apple iPhone15
Wrong UPI Payment : चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका, ही सोपी ट्रिक्स करेल तुमची मदत

अ‍ॅपलनं भारतातील उत्पादन वाढवलं आहे. अशात लॉन्चिंगच्या दिवशी भारतात तयार होणारे आयफोन दक्षिण आशियाच्या बाजारात पोहोचवण्यासाठी तयारी केली जात आहे. दरम्यान कोरोना महामारीनंतर अ‍ॅपलसह अनेक कंपन्या या चीनमधील आपल्या उत्पादन प्लांट हलवत आहेत. उत्पादन प्लांट स्थापित करण्यासाठी भारत हे ठिकाण आवडतं बनलंय. मागील वर्षी अ‍ॅपलनं आयफोन १४ चं उत्पादन भारतात सुरू केलं होतं आणि आता हे मोबाईल जगभरात पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'चा हा परिणाम असून इतर देशाच्या कंपन्यादेखील भारतात उत्पादन प्लांट सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. अ‍ॅपलसाठी आयफोन बनणारी सप्लायर कंपनी फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुपनं मागील महिन्यात तमिळनाडूच्या कारखान्यात अ‍ॅपल आयफोन १५ चं उत्पादन सुरू केलं होतं. Apple iPhone 15 लॉन्च करण्यासोबतच कंपनी आज आपल्या यूएसच्या ऑफिसमध्ये नवीन AirPodsही लॉन्च करू शकते.

नवीन उत्पादनाची विक्री लॉन्चिंगनंतर दहा दिवसानंतर सुरू होईल. दरम्यान अ‍ॅपलनं यावर्षी भारतात मुंबई आणि दिल्लीमध्ये नवीन स्टोअर उघडले आहेत. म्हणजेच Apple iPhone 15 जगात जेव्हा खरेदीसाठी उपलब्ध होईल, तसाच तो भारतातही लगेच उपलब्ध होईल.

Apple iPhone15
Pregnant Woman Death: मोबाईल चार्ज करताना एक चूक जीवावर बेतली! गर्भवती महिलेचा दुर्देवी मृत्यू; बाळही दगावले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com