Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजना काय आहे? कार्ड असून लाभ घेता येत नाही? कशी कराल तक्रार

PM Jan Arogya Yojana : आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना होय
Ayushman Bharat Scheme
Ayushman Bharat Scheme Saam Tv

आयुष्मान भारत योजना (Government Scheme) :

केंद्र सरकारमार्फत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यातील एक आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना होय. यामार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते.

ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ साली सुरु करण्यात आली होती. या योजनेतून अनेक गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य विमा उपलब्ध केली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेतून १० कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच ज्या लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे त्यांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.

Ayushman Bharat Scheme
Swadesh Darshan Yojana : केंद्र सरकारची 'स्वदेश दर्शन योजना' नक्की काय आहे? कसा होतो उपयोग? वाचा उद्देश आणि वैशिष्ट्ये

1. सुविधा कशी मिळेल?

  • जर तुमच्याकडे आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्ड असेल तर भारतातील (India) कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतो.

  • जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्डधारक असाल आणि या योजनेत असणाऱ्या हॉस्पिटलने (Hospital) रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तर तुम्ही तातडीने रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल करु शकता.

  • तक्रार दाखल केल्यानंतर शासनाकडून रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाते.

2. आपण तक्रार कधी करू शकत नाही?

तक्रार (Complaint) केवळ एका अटीवर केली जाते शकते, ती म्हणजे रूग्णालयात रुग्णावर विशिष्ट उपचार असायला हवेत. रूग्णाच्या उपचारासाठी रूग्णालयात विशिष्ट उपचार सुविधा उपलब्ध नसल्यास, आपण तक्रार नोंदवू शकत नाही.

3. आपण तक्रार कशी आणि कुठे करू शकता?

  • आयुष्मान भारत योजना कार्डधारक आपली तक्रार राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 14555 वर नोंदवू शकतात.

  • आयुष्मान भारत योजनेंतर्गत, विविध राज्यांसाठी तक्रारी नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.

Ayushman Bharat Scheme
Government Schemes: मुलींसाठी जबरदस्त 5 सरकारी योजना; शिक्षणापासून लग्नापर्यंत, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com