Car Buying Budget Tips: कार घ्यायचीय, तुमचा पगार किती असावा? डाउनपेमेंट आणि EMIचं गणित कसं असेल? वाचा डीटेल्स

Budget Car Tips: अनेकांना कार घेण्याची इच्छा असते. फीचर्स आणि लूकच्या चक्करमध्ये आपण आपल्या बजेटपेक्षा महागडी कार खरेदी करत असतो.
Car Buying Budget Tips
Car Buying Budget TipsSaam Tv

Car Buying Budget Tips:

अनेकांना कार घेण्याची इच्छा असते. फीचर्स आणि लूकच्या चक्करमध्ये आपण आपल्या बजेटपेक्षा महागडी कार खरेदी करत असतो. यानंतर आपल्याला मोठा आर्थिक फटका बसत असतो आणि अधिक हप्ते भरावी लागतात. कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे मोठी बचत असेल तर हरकत नाही, पण जर तुम्ही ईएमआयवर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.(Latest News on Business)

कार घेताना काही गोष्टीं डोक्या राहू द्या. विशेषत: नोकरदार वर्गाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. अनेकजण कार घ्यायला जातात आणि आपली मिळकत आणि खर्च डोक्यात न घेता महागडी कार घरी घेऊन येतात. त्यानंतर हप्ते भरताना नाकीनऊ येत असतं. अनेकजण कारचं फीचर्स आणि लूक पाहून आपल्या बजेटच्या बाहेरील कार खरेदी करतात. कार घरी आणल्यानंतर आनंद वाटतो, परंतु काही दिवस झाल्यानंतर कारचा हप्ता भरण्याचं टेन्शन येत असतं. मोठे हप्ते भरावे लागत असल्यानं आपलं महिन्यांच सर्व बजेट कोलमडत असतं.

जर तुम्ही नोकरदार असाल तर कार घेताना योग्य बजेट मांडून कार घेण्याचा प्लान करावा. तुम्ही वर्षानुवर्षे कार खरेदी करण्यासाठी बचत केली असेल, तर तुमच्याकडे जमा झालेल्या रकमेनुसार तुम्ही चांगली कार खरेदी करू शकाल. पण जर तुम्ही बजेट बनवण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्या वार्षिक पगाराचा तो महत्त्वाचा भाग असेल. जनरल मॅथेमॅटिक्समुळे तुम्ही तुमची गाडी घेण्याचे बजेट सहज जाणून घ्या. जेणेकरून तुम्हाला सहज गाडी घेता येईल.

जेणेकरून तुमचे बजेट डळमळीत होणार नाही. आपली कार आपल्या वार्षिक पॅकेजच्या अर्ध्यापेक्षा जास्त असू नये. तुमचे वार्षिक पॅकेजावरही कार घेणं अवलंबून असतं. यामुळे आपल्या वार्षिक पॅकेजबरोबरच कर्ज, कार डाउन पेमेंट आणि ईएमआयचा हिशोब आधी करावा. समजा तुमचे वार्षिक पॅकेज १० लाख रुपये असेल तर तुम्ही ५ लाख रुपयांपर्यंतची कार खरेदी करावी. जर तुमचे पॅकेज २० लाख रुपयांचे असेल तर तुम्ही १० लाख रुपयांपर्यंत कार खरेदी करू शकता.

कारसाठी भरण्यात येणारं डाऊन पेमेंट वार्षिक पॅकेज २० पेक्षा जास्त असू नये. कारसाठी घेण्यात आलेलं कर्ज ४ वर्षापेक्षा जास्त कालवधीसाठी घेऊ नये. म्हणजेच त्याची फेड ४ वर्षात करावी. कारच्या कर्जाचा हप्ता हा तुमच्या वार्षिक पॅकेजच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असून नये. जर तुम्ही या गोष्टी डोक्यात ठेवत असाल तर कार घेणं फायद्याचं ठरेल आणि तुम्ही आनंदानं कारची राईड कराल.

Car Buying Budget Tips
Home loan : 'ड्रीम होम' खरेदी करणे आणखी सोपं होणार; रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा कर्जात समावेश होणार?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com