
सोने (Gold) खरेदी करून त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनं सॉवरेन गोल्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) सीरिज २ ची घोषणा केलीय. यासाठी तुम्ही आजपासून अर्ज करू शकतात. पण लक्षात ठेवा संधी फक्त पाच दिवसांसाठी असणार आहे.
यावेळी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२३-२४ सीरीज दोन अंतर्गत रिझर्व्ह बँकेने १ ग्रॅमची किमत ५ हजार ९२३ रुपये ठेवलीय. जर तुम्ही डिजिटल पद्धतीने पेमेंट करून सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला यात सूट मिळेल. ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे मूळ किमतीत ५० रुपयांची सूट मिळू शकतात. म्हणजेच फक्त ५ हजार ९२३ रुपयांऐवजी ५ हजार ८७३ रुपयांचे पेमेंट करावे लागेल.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL),पोस्ट कार्यालय आणि स्टॉक एक्सचेज एनएसई(NSE),BSEच्या माध्यमातून खरेदी करता येईल. याचे पेमेंट डिजिटल पद्धतीने म्हणजेच युपीआय करून करू शकतात. जर तुम्हाला दुकानात जाऊन बिल द्यायचे असेल तर रोख कॅश, चेक आणि ड्राफ्टनं पेमेंट करू शकतात.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये कोणी व्यक्ती, एचयुएफ, ट्रस्ट, विश्वविद्यालये आणि चॅरिटेबल संस्था गुंतवणूक करू शकतात. या स्कीममध्ये कमीत-कमी १ ग्राम सोने घेऊन तुम्ही गुंतवणूक करू शकतात. तर कोणी व्यक्ती या स्कीमध्ये ४ किलोग्रॅम सोन्याची खरेदी करू गुंतवणूक करू शकते. तर ट्रस्ट आणि अशा काही संस्था या स्कीमध्ये जास्ती जास्त २० किलो सोने खरेदी करून गुंतवणूक करू शकतात.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम ही दीर्घकालीन गुंतवणक करता येणारी योजना आहे. याचा लॉक इन कालावधी हा ८ वर्षाचा आहे. दरम्यान तुम्ही या स्कीममधून ५ व्या वर्षी सुद्धा बाहेर पडू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास सरकारकडून एक प्रमाणपत्र मिळत असतं.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमला डीमॅट फॉर्ममध्येही बदला येते. तसेच कर्जाच्या कोलॅटरल म्हणून म्हणजेच कर्जाच्या पेमेंटसाठी या योजनेचा वापर देखील करता येतो. जर तुम्ही कर्ज घेतलं असेल त्यात तुम्ही डिफॉल्ट झालात तर ते बँकेकडून जप्त केलं जातं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारकडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम राबवली जाते. या स्कीमकडे फिजिकल गोल्डचा पर्याय म्हणूनही पाहिलं जाते. सॉवरेन गोल्डच्या स्कीममध्ये गुंतवणूक करणं खूप फायदेशीर असतं. सोने शुद्ध असल्यामुळे यात कोणत्याच प्रकारचा धोका नसतो. या योजनेवर सुरुवातीच्या गुंतवणकीवर वार्षिक व्याज २.५० टक्क्यांनी मिळत असते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.