
डॉलरच्या घसरलेल्या किमतीमुळे सोन्या-चांदीच्या भावात नरमाई दिसून येतं आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भाव घसरल्याने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे.
मागच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायाला मिळाले आहे. तसेच अमेरिकेतील महागाई आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे भाव कमी जास्त होतात. जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.
1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार शनिवारी सकाळच्या दरानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६,००० रुपये मोजावे लागले. तर आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९९ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५,९९९ रुपये मोजावे लागणार आहे.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार शनिवारी चांदीचा भाव हा ७,४०० रुपये होता तर आज ७३५० रुपये मोजावे लागणार आहे.
3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,499
22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 43,992
22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 54,990
4. 24 सोन्याचा आजचा भाव
24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 5,999
24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 47,992
24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 59,990
5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,830 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,830 रुपये असेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.