Delete Photos Tips: अरर...! चुकून फोटो डिलीट झाला; टेंशन नको, 'या' सिक्रेट टिप्सने परत मिळवा

Phone Tips: अनेकदा आपल्याकडून चुकून म्हवताचे काही फोटो डिलेट होतात.
Delete Photos Tips
Delete Photos TipsSaam TV

How To Recover Deleted Photos:

आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आहे. या फोनचा वापर करत सर्वजण आपल्या आठवणी, आवडते क्षण मोबाईलमध्ये कैद करतात. अशात फोटो गॅलरी फुल झाल्याने आपण काही फोटोज् डिलीट करतो. अनेकदा आपल्याकडून चुकून महत्वाचे काही फोटो डिलीट होतात. (Latest Marathi News)

आवश्यक असलेले फोटो गॅलरीमधून डिलीट झाल्यावर काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही. अनेक व्यक्ती अशावेळी फोटो परत न मिळवताच शांत राहतात. मात्र डिलीट झालेले फोटो परत मिळवणं शक्य आहे, हे तुम्हाला माहितीये का?

Delete Photos Tips
Online Order Froud : ऑनलाइन कॅमेरा मागवला मिळाला साबण; पोलिसात गुन्हा दाखल

फोटो डिलीट झाला तरी तो पूर्णतः डिलीट झालेला नसतो. प्रत्येकाच्या फोन गॅलरीमध्ये एक हाईड बॉक्स असतो. यामध्ये देखील हा फोटो सेव होतो. तुम्ही फोनमधून डिलीट केलेले सर्व फोटो या बॉक्समध्ये 30 दिवस राहतात. फोटो गॅलरीच्या बॅकअप बॉक्समध्ये फोटो सेव्ह राहतात. याची मुदत 30 दिवसांचीच आहे. म्हणजे इथे तुम्हाला 30 दिवसांपर्यंतचे फोटोज् मिळतील.

डिलीट फोटोज् आणि व्हिडीओ असे मिळावा परत

  1. सगळ्यात आधी तुमच्या फोनमधील गॅलरीमध्ये जा.

  2. पुढे खालच्या साइडला तुम्हाला एक अल्बम दिसेल. त्यावर क्लिक करा.

  3. अल्बममध्ये आल्यावर पुढे आणखी काही पर्याय दिसतील. त्यातील रीसेंट डिलीटवर क्लिक करा.

Delete Photos Tips
Sushmita Sen Received Doctorate: सुष्मिता सेनच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा; पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

4. पुढे तुम्ही गेल्या 30 दिवसांमध्ये जे जे फोटो डिलीट केलेत ते तुम्हाला दिसतील. यातील तुम्हाला जे फोटो हवेत ते सिलेक्ट करा.

5. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डिलीट झालेले फोटो किंवा व्हिडीओ परत मिळवू शकता.

6. गुगल फोटोज् मध्ये हे फोटो 60 दिवस सेव्ह राहतात. तुम्ही येथून देखील फोटो परत मिळवू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com