Investment Tips: 'या' सरकारी योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीवर मिळणार सर्वाधिक व्याज

Investment Tips In Marathi: 'या' सरकारी योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीवर मिळणार सर्वाधिक व्याज
Government Savings Scheme
Government Savings SchemeSaam Tv

Investment Tips In Marathi:

आपल्यापैकी बहुतेकांना आपली बचत अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवायची आहे, जिथे आपल्याला बाजारातील कोणत्याही प्रकारच्या जोखमींचा सामना करावा लागणार नाही. यातच बरेच लोक त्यांच्या पैशांवर चांगला परतावा मिळविण्यासाठी त्यांची बचत स्टॉक मार्केट किंवा कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतात.

मात्र गुंतवणुकीच्या या क्षेत्रांमध्ये पैसे गमावण्याचा धोका असतोच. याच कारणामुळे बहुतेक लोक आपली बचत बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवतात. या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला अशाच काही जबरदस्त सरकारी बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला FD पेक्षा जास्त परतावा मिळत आहे. एवढेच नाही तर या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक मोठे फायदेही मिळतात. चला तर जाणून घेऊन कोणत्या आहेत या सरकारी योजना...

Government Savings Scheme
LIC Policy: ही पॉलिसी एकदा खरेदी करा, आयुष्यभर मिळेल 11,192 रुपये पेन्शन

PPF

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. ही एक छोटी बचत योजना आहे. (Latest Marathi News)

मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Plan)

या योजनेत तुम्हाला ७.४ टक्के व्याज मिळते. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला मासिक आधारावर व्याज दिले जाते. यामध्ये तुम्ही सिंगल आणि जॉइंट दोन्ही खाते उघडू शकता. (Utility News)

Government Savings Scheme
Business Ideas: फक्त 15 हजार रुपये गुंतवून सुरु करा 'हा' व्यवसाय, लाखो रुपयांची होईल कमाई

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत १,००० रुपये गुंतवून तुम्ही तुमचे खाते देखील उघडू शकता. तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता. तसेच तुम्ही संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकता.

किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Yojana)

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळते. यामध्ये तुम्ही किमान १,००० रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच जास्तीत जास्त गुंतवणूक रकमेची मर्यादा निश्चित केलेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com