RBI New Rules: कर्जधारकांना सर्वात मोठा दिलासा; आरबीआयनं बँकांना दिले महत्वाचे निर्देश

RBI New Rules: आरबीआयच्या निर्देशानुसार, कर्जधारकाने परतफेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यास बँकांनी घेतलेली कागदपत्रे ३० दिवसांच्या आत परत देणे अनिवार्य आहे.
RBI New Rules
RBI New RulesSaam Tv

RBI on Home Loan

घेतलेल्या कर्जाची परतफेड करुनही बँक कागदपत्रे परत करत नसल्याच्या तक्रारी अनेकदा कर्जधारकांकडून करण्यात येतात. अशा बँकांवर आता आरबीआर कठोर कारवाई करणार आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कर्जधारकाला तारण ठेवलेली कागदपत्रे न दिल्यास बँकांवर दंड आकारला जाणार आहे. (Latest Marathi News)

भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने याबाबतचे निर्देश जाहीर केले आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार, कर्जधारकाने परतफेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यास बँकांनी घेतलेली कागदपत्रे ३० दिवसांच्या आत परत देणे अनिवार्य आहे. जितके दिवस उशीर होईल, त्या प्रत्येक दिवसाचे प्रत्येकी ५ हजार रुपये इतका दंड आकारला जाईल.

RBI New Rules
Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, कुणाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांसमोर आज होणार सुनावणी

आरबीआयने दिलेले हे निर्देश पर्सनल लोन, होम लोन, कार लोन आणि गोल्ड लोनसह स्थावर-जंगम मालमत्ता गहाण ठेवून त्यावर कर्ज घेणाऱ्यांसाठी लागू होणार आहेत. या निर्देशामुळे बँकांच्या मनमानी कारभारांना चांगलाच चाप बसणार असून कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे.

आरबीआयने (RBI) जारी केलेले हे निर्देश १ डिसेंबर २०२३ पासून लागू केले जाणार आहे. अनेकदा आर्थिक चणचण भासत असल्याने नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य व्यक्ती बँकेकडून कर्ज मिळावे, यासाठी अर्ज करतो. गरज भागल्यानंतर अनेकजण प्रामाणिकपणे घेतलेल्या कर्जाची परतफेड करतात.

मात्र, कर्जाची संपूर्ण रक्कम चुकती केल्यानंतरही बँका कर्जधारकांची अडवणूक करतात. कर्जासाठी गहाण ठेवलेली कागदपत्रे, तसेच मालमत्ता परत देण्यासाठी बँका अडवणूक करतात. त्याचबरोबर कर्जधारकांनी गहाण ठेवलेली कागपत्रे बँकांकडून गहाळ देखील होतात.

तुमची कागदपत्रे मिळत नाहीये, ती खराब झाली आहे, असं म्हणून बँका हात झटकतात. पण आता बँकांना जबाबदारी झटकता येणार नाही. अशा घटनांमध्ये बँकांवर नुकसान भरपाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जर कागदपत्रे हरवली तर बँकांना पुढील ३० दिवसांत ग्राहकांना ही कागदपत्रे नवीन तयार करुन द्यावी लागतील.

Edited by - Satish Daud

RBI New Rules
Pune Breaking News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com