Investment Tips: रोजचे फक्त 40 रुपये वाचवा आणि लखपती व्हा; गृहिणींना श्रीमंत करणाऱ्या 3 योजना

Savings Investments Housewives: गृहिणी घरच्या घरी पैशांची बचत करून ते योग्य ठिकाणी गुंतवल्यास लखपती होऊ शकतात.
Investment Tips
Investment TipsSaam TV

Housewives Investments Tips:

रोजच्या दिवसाचा खर्च किती असावा याचं गणित प्रत्येक गृहिणी ठरवून ठेवते. तसेच उरलेल्या पैशांची बचत करून सेविंग करते. गृहिणींनी घरच्या घरी पैशांची बचत करून ते योग्य ठिकाणी गुंतवल्यास लखपती होऊ शकतात. त्यामुळे आज गृहिणींना लखपती बनवणाऱ्या काही योजनांची माहिती जाणून घेऊ. (Latest Investments News)

Investment Tips
Investment Plan For Pension: LIC ची जबरदस्त स्कीम! एकदाच पैसे भरा अन् मरेपर्यंत पेन्शन मिळवा

महिलांना बचतीसाठी अनेक योजना आहेत. त्यातीलच गृहिणींसाठी खास आलेली महिला सन्मान सेवींग सर्टिफिकेट ही पोस्टची एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने गृहिणी व्याजावर चांगली बचत करू शकतात.

फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक

महिला सन्मान सेवींग सर्टिफिकेट या योजनेत कोणत्याही प्रकारचा धोका नाही. येथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल. या योजनेत गृहिणींना 7.5 टक्के व्याज वर्षाला मिळते. यासाठी रोजचे 40 रुपये साठवले तरी महिन्याला 1200 रुपये साठतात. महिला सन्मान सेवींग सर्टिफिकेट या योजनेत तुम्ही 2 लाखांपर्यंत बचत करू शकता.

रिकरिंग डिपॉजीट

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉजीटमध्ये तुम्ही अवघ्या 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत 6.5 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. असे तज्ज्ञांचे मत आहे. ही फार छोटी गुंतवणूक योजना आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील गृहिणी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

एसआयपी

म्युच्युअल फंडमधील एसआयपी देखील गुंतवणुकीसाठी अनेक व्यक्ती निवडतात. गुंतवणुकदार एसआयपीला अधिक पसंती देतात. महिला यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. एसआयपीमध्ये 12 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून गृहिणी या योजनेतून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतात.

(टीपः वरील गुंतवणुकीचे फक्त सल्ले आहेत. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.)

Investment Tips
Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडचा मास्टर प्लॅन; फक्त १०० रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com