New IPO List : गणेशोत्सवात झटपट कमाईची संधी, 4 आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा

Share Market News in Marathi: आरआर केबल, सामी हॉटेल्स, जगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आणि चावडा इन्फ्रा या कंपन्याचे आयपीओ मार्केटमध्ये येणार आहेत.
IPO
IPO

Share Market News :

शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. इंट्राडे, इक्विटीप्रमाणे आयपीओमध्येही गुंतवणूक करुन चांगली कमाई करता येते. पुढील काही दिवस आयपीओ मार्केटसाठी चांगले असणार आहे. अनेक लहान-मोठ्या कंपन्यांचे IPO लवकरच लॉन्च केले जाणार आहेत.

आयपीओतून कमी वेळेत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळू शकतो. या आठवड्यात चार नवीन IPO येणार आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भरपूर कमाई करण्याची संधी आहे. आरआर केबल, सामी हॉटेल्स, जगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आणि चावडा इन्फ्रा या कंपन्याचे आयपीओ मार्केटमध्ये येणार आहेत. (Latest Marathi News)

IPO
Share Market Closing: शेअर बाजाराने केले मालामाल! निफ्टी 20,000 पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले 3 लाख कोटी रुपये

IPO कधी येणार आहेत?

चावडा इन्फ्राचा IPO (Chavda Infra IPO) आज 12 सप्टेंबर रोजी ओपन झाला आहे. यानंतर, आर आर केबलचा (RR Kabel) IPO 13 सप्टेंबर रोजी उघडेल. 14 सप्टेंबर रोजी दोन कंपन्या एकत्रितपणे त्यांचा IPO लॉन्च करणार आहेत. ज्यामध्ये सामी हॉटेल्स (SAMHI Hotels IPO) आणि जीगल प्रीपेड ओशियन सर्व्हिसेस (Zaggle Prepaid Ocean Services IPO) यांचा समावेश आहे. (Utility News)

IPO
Investment Tips: 'या' सरकारी योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीवर मिळणार सर्वाधिक व्याज

चावडा इन्फ्रा IPO 14 सप्टेंबरपर्यंत चालेल आणि लिस्टिंग 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. आर आर केबलमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीची संधी आहे. तर 26 सप्टेंबर रोजी लिस्टिंग होणार आहे.

सामी हॉटेल्स आणि जगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस IPO 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान खुले असतील. दोन्ही कंपन्यांची लिस्टिंग 27 सप्टेंबरला होणार आहे.

(DISCLAIMER : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com