Tata Motors
Tata MotorsSaam tv

Tata Motors: टाटा मोटर्सने साऊथ इंडियन बँकेसोबत केला सहयोग; अधिकृत प्रवासी ईव्‍ही डीलर्ससाठी विशेष फायनान्सिंग प्रोग्राम लाँच

टाटा मोटर्स या भारतातील ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने भारतातील खासगी क्षेत्र बँक साऊथ इंडियन बँकेसोबत सहयोग केला आहे.

Tata Motors News: टाटा मोटर्स या भारतातील ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने भारतातील खासगी क्षेत्र बँक साऊथ इंडियन बँकेसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत विशेष इलेक्ट्रिक वेईकल डिलर फायनान्सिंग प्रोग्राम लाँच करण्‍यासह सर्व ग्राहकांना सर्वसमावेशक रिटेल फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येतील. (Latest Marathi News)

या सहयोगासाठी टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.च्‍या नेटवर्क मॅनेजमेंट अॅण्‍ड ईव्‍ही सेल्‍सचे वरिष्‍ठ महाव्‍यवस्‍थापक रमेश दोराईराजन आणि साऊथ इंडियन बँकेच्‍या ट्रान्झॅक्‍शन बँकिंग ग्रुपचे प्रमुख प्रवीण जॉय यांनी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षऱ्या केल्‍या.

Tata Motors
Honda City वर मिळत आहे तब्बल 73,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.च्‍या नेटवर्क मॅनेजमेंट अॅण्‍ड ईव्‍ही सेल्‍सचे वरिष्‍ठ महा-व्‍यवस्‍थापक रमेश दोराईराजन म्‍हणाले, ''भारतात ईव्‍ही अवलंबतेला चालना देणे हा आमच्‍या धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आम्‍हाला हाच दृष्टिकोन असलेल्‍या सहयोगींसोबत भागीदारी करण्‍याचा आनंद होत आहे.

'आमच्‍या अधिकृत इलेक्ट्रिक पॅसेंजर वेईकल डिलर्ससाठी विशेष फायनान्सिंग प्रोग्रामकरिता साऊथ इंडियन बँकेसोबतचा हा सहयोग याच दिशेने पाऊल आहे. आमचे डिलर भागीदार भारतात ईव्‍हीच्‍या व्‍यापक अवलंबेतला चालना देण्‍याप्रती आमच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण भाग आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, हा उपक्रम आम्‍हाला देशात इलेक्ट्रिक वेईकल्‍सचे लोकशाहीकरण करण्‍यास अधिक साह्य करेल.'

या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत साऊथ इंडियन बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मुरली रामाकृष्‍णन म्‍हणाले, ''आम्‍हाला टाटा मोटर्ससोबत त्‍यांच्‍या पॅसेंजर इलेक्ट्रिक वेईकल डिलर्सकरिता फायनान्सिंग प्रोग्राम लाँच करण्‍यासाठी सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. हा प्रोग्राम बँकेला आपला मालमत्ता पाया विस्‍तारित करण्‍यास आणि नवीन ग्राहक विभागांपर्यत पोहोचण्‍यास मदत करेल. आम्‍ही टाटा मोटर्ससोबत त्‍यांच्‍या डिलर्सच्‍या व ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी विविध उपक्रम व ऑफर्ससह सहयोग कायम ठेवण्‍यास उत्‍सुक आहोत.''

टाटा मोटर्स आपल्‍या उल्‍लेखनीय प्रयत्‍नांसह भारतीय ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठेत अग्रस्‍थानी आहे आणि सध्‍या ७१ टक्‍क्‍यांच्‍या लक्षणीय मार्केट शेअरसह भारतातील ई-मोबिलिटी लाटेचे नेतृत्‍व करत आहे, जेथे आतापर्यंत वैयक्तिक व ताफा विभागांमध्‍ये ९०,००० हून अधिक ईव्‍हींची निर्मिती करण्‍यात आली आहे.

Tata Motors
Railway Ticket Rule: जनरल तिकीट काढल्यानंतर किती वेळा ट्रेन बदलू शकतो? यावर मर्यादा आहे का?

साऊथ इंडियन बँक तंत्रज्ञान-आधारित बँकिंगमध्‍ये अग्रणी आहे, तसेच अनेक डिजिटल उत्‍पादने व सेवा प्रदान करत आहे. या बँकेमध्‍ये देशातील बँकिंग क्षेत्रामधील सर्वात तरूण कर्मचारीवर्ग आहे. बँकेचे व्हिजन २०२४- ६ सी वर लक्ष केंद्रित करते - कॅपिटल, सीएएसए, कॉस्‍ट-टू-इन्‍कम, कम्‍पीटन्‍सी बिल्डिंग, कस्‍टमर फोकस आणि कम्‍प्‍लायन्‍स.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com