Apple iPhone 15: Type C चार्जरचे जबरदस्त फायदे; वाचतील तुमच्या खिशातील पैसे

Type C Benefits: मात्र आता टाईप सीमुळे बऱ्याच अडचणी दूर झाल्या आहेत.
Apple iPhone 15
Apple iPhone 15Saam TV

Apple iPhone 15:

ऍपल कंपनीने आयफोन 15 मध्ये टाईप सी चार्जिंगची सुविधा दिली आहे. आयफोन वापरणाऱ्या व्यक्तींना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी आयफोन वापरणाऱ्या व्यक्तींना फोन चार्ज करण्यासाठी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र आता टाईप सीमुळे बऱ्याच अडचणी दूर झाल्या आहेत. तर आज या बातमीतून टाईप सीचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ. (Latest Marathi News)

Apple iPhone 15
Type 3 Diabetes : टाइप- 1 व टाइप-2 पेक्षा अधिक भयंकर आहे टाइप - 3 चा मधुमेह, 'या' व्यक्तींनी वेळीच व्हा सावध...

सर्व डिवाईजसाठी सिंगल केबल

अॅपलच्या सर्व प्रकारच्या डिवाईजसाठी तुम्ही एकच चार्जिंग केबल वापरू शकता. यामध्ये Macs, AirPods Pro 2nd gen, iPads यासाठी एकच चार्जर लागेल. याने तुमचा डेटा आणि चार्जिंग देखील ट्रान्स्फर करता येईल.

एक्स्टर्नल डिस्प्ले सपोर्ट

आयफोन 15 वापरणाऱ्या व्यक्तींना या सिरिजच्या सर्व फोनमध्ये सी टाईप यूएसबी कनेक्ट करता येईल. यासह HDMI डिस्प्ले देखील कनेक्ट करता येईल. एखाद्या मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओ पाहणे आणि एडिट करणे या सुविधा मिळतील.

4.5 वॅटपर्यंत चार्जिंग

तुम्ही आयफोन 15 वापरत असाल आणि तुमच्याकडे आयपॉड तसेच ॲपल वॉच असेल तर सी टाईप केबलचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. तुमच्या इतर डीवाईजला तुम्ही एकाच केबलणे 4.5 वॅटपर्यंत चार्जिंग करू शकता.

पैशांची बचत

आयफोनमध्ये सी टाइप चार्जिंग पिन दिल्याने युजर्सचे बरेच पैसे वाचले आहेत. अन्यथा या फोनला चार्जिंग करण्यासाठी वेगळं अडॉपटर खरेदी करावे लागत होते. सी टाइप केबल असल्याने नागरिकांचे तब्बल 250 मिलियन यूरो वाचले आहेत, अशी माहिती युरोपियन युनियनने दिली आहे.

Apple iPhone 15
Types Of Diabetes: हे आहेत डायबिटिजचे प्रकार, वेळीच घ्या काळजी नाहीतर...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com