एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक

साम टीव्ही
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

या बैठकीला बैठकीला गुलाबराव देवकर, अनिल पाटीलही उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला NCPत घेण्याबाबत ही बैठक असल्याची चर्चा रंगलीय. जळगावातील तो बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याचं सांगण्यात येतंय. 

राज्यातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झालीय. मुंबईतील NCP कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची तातडीची बैठक पार पडली.

या बैठकीला बैठकीला गुलाबराव देवकर, अनिल पाटीलही उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला NCPत घेण्याबाबत ही बैठक असल्याची चर्चा रंगलीय. जळगावातील तो बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याचं सांगण्यात येतंय. 

गेल्या कित्येक दिवसांपासून खडसे आणि भाजपात वाद विवाद सुरु आहे. एकनाथ खडसे भाजप पक्षावर नाराज असल्याचं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलंय. मात्र भाजप त्यांच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेत नसल्याचं खडसेेंचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर वेळोवेळी देवेंद्र फडणवीस आणि खडसे वाद दिसून आला आहे. फडणवीसांमुळे खडसेंचं भाजपातील स्थान कमी होत असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. यावर फडणवीसांनीही खडसेंवर उत्तरं दिलीत. 

पाहा सविस्तर व्हिडिओ -

मुंबईतील NCP कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची तातडीची बैठक पार पडली.

या बैठकीला बैठकीला गुलाबराव देवकर, अनिल पाटीलही उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला NCPत घेण्याबाबत ही बैठक असल्याची चर्चा रंगलीय. जळगावातील तो बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याचं सांगण्यात येतंय. 

मात्र एकनाथ खडसेंकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. माझी अजून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांसोबत चर्चा झालेली नाही. अशी माहिती एकनाथ खडसेंनी साम टीव्हीला दिलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live