VIDEO | CAA, NRC विरोधात आज भारत बंद

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 29 जानेवारी 2020

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC, EVMला विरोध करण्यासाठी  बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.या भारत बंदमध्ये पंढपूरमधील व्यापारीही सहभागी झालेत.सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी सर्व दुकानं बंद ठेवलीत.यामुळे बाजार समितीमधील डाळिंब , केळीचे  सौदे रद्द झालेत.तर सुमारे 50 लाख रूपयांची उलाढाल ठप्प झालीय.

दुसरीकडे बंदमुळे बारामतीतील बाजारपेठा पूर्णत बंद असल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळतंय.या बंदमुळे शहरातील चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर तिकडे जळगाव जिल्ह्यातील जामनेर बंदची हाक देण्यात आलीय.या बंदमध्ये सर्व व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटना सहभाग नोंदवलाय.या बंदमध्ये भारत मुक्ती मोर्चासह राष्ट्रीय मुस्लिम मंच, छत्रपती संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस तसेच आदिवासी एकता परिषदेने सहभाग नोंदवलाय. 

याशिवाय पालघरमध्ये बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर घटक पक्षाच्या वतीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय.शहरी भागातील बाजारपेठा काही प्रमाणात बंद आहेत.तर काही भागात बाजारपेठा सुरळीत आहेत.जिल्ह्यांतील ग्रामीण भागात बंदला अल्पसा प्रतिसाद असून.शाळा- महाविद्यालयासह बाजारपेठा सुरळीत सुरू आहेत.

तर औरंगाबादमध्ये बाजार समितीच्या भाजीमंडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणाऱ्या भाजी मंडईत आज शुकशुकाट पाहायला मिळाला..सर्व आडत्यांनी आपला व्यवहार बंद ठेवल्यानं लाखो रुपयांची उलाढाल ठप्प आहे.

WebTittle :: CAA, India closed today against NRC

संबंधित बातम्या

Saam TV Live