उत्तरप्रदेशात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे... काय आहे प्रकरण ?

योगी
योगी

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये Uttar Pradesh योगी Yogi सरकारच्या Government मंत्री मंडळात Cabinet फेरबदलाचे Reshuffle वारे वाहू लागले आहेत. २०२२ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा इलेक्शन Election आधी उत्तरप्रदेशला नवा उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Cabinet Reshuffle In Uttar Pradesh 

उपमुख्यमंत्री Deputy CM पदाच्या शर्यतीत अनेक जण धावत असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आईएसएस अधिकारी ए.के.शर्मा हे उत्तरप्रदेशचे नवे उपमुख्यमंत्री असू शकतात.

हे देखील पहा -

विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना राज्यमंत्री मंडळातून डच्चू देऊन उत्तरप्रदेश भाजपाच्या  प्रदेश अध्यक्ष पदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  Cabinet Reshuffle In Uttar Pradesh 

विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे ओबीसी OBC नेते आहेत. उत्तरप्रदेशातील जातीय समीकरणांना समोर ठेवून मौर्य यांना राज्यभरात निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा करून ओबीसी समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरु असल्याचे बोलले जात आहे.

मौर्य यांच्या नेतृत्वातच मागील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचे ध्रुवीकरण करत करिष्मा करून दाखवला होता. तेच कार्ड आता पुन्हा खेळण्याच्या तयारीत उत्तर प्रदेश भाजप दिसत आहे.Cabinet Reshuffle In Uttar Pradesh 

मात्र तोच प्रयोग पुन्हा राबवून भाजप BJP  किती प्रमाणात यशस्वी होईल व त्याच्या प्रत्युत्तरात विरोधी पक्ष कोणता डाव खेळतील हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची सुरु असलेली पीछेहाट व पंचायत निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ फेरबदलाला अनन्यसाधारण महत्व आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com