मांजरांनाही होऊ शकतो कोरोना?

साम टीव्ही न्यूज
रविवार, 17 मे 2020

मांजरांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या मांजरांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. 

मुंबई : अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात असलेल्या 4 वर्षांच्या वाघिणीलाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी मध्यंतरी आली होती. त्यानंतर भारतातील प्राणी संग्रहालयात विशेष खबरदारी घेण्यात आली.  मांजरांना कोरोनाची लागण होऊ शकते व त्यांच्या संपर्कात येणार्‍या अन्य मांजरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. असे एका संशोधनात समोर आले आहे. भारतात अशी कोणतीही घटना  आतापर्यंत समोर आली नसे तरी नागरिकांना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन पशु वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

 तुमच्याकडे मांजर असेल तर काय कराल? 
 प्राणी हाताळल्यावर हात धुवा
 सॅनिटीझर लावा
 विभागातील प्राण्यांना खायला देत असाल तर घरी आल्यावर अंघोळ करा 
 प्राण्यांना सकस आहार द्या 
 आजारी असलेल्या प्राण्यांना डॉक्टरांना न्या
 सतत मास्कचा वापर करा. 

 भारतात अजून अजून तरी मांजरांना कोरोना झाल्याचे आढळून आलेले नाही. आता न्यू इंग्लड जनरल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशीत झालेल्या एका संशोधनानुसार कोरोनाग्रस्त रुग्णालयातील विषाणूंनी तीन मांजरांना संक्रमित केले. त्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करण्यात आले असता मांजरांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या मांजरांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.  महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात राज्य शासनाची 10 ते 12 पशु वैद्यकीय रुग्णालये आहेत. तसेच नागपूर विद्यापीठाचीही पशुवैद्यकीय महाविद्यालये नागपूरसह, मुंबई, परभणी, शिरवळ, उदगीर आणि अकोला याठिकाणी आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सतर्क मात्र रहावे लागेल. 

WebTittle :: Can cats have corona? 


संबंधित बातम्या

Saam TV Live