100 कोटी भारतीयांना होऊ शकतो कोरोना? वाचा काय आहे नीति आयोगाचा इशारा?

साम टीव्ही
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020
 • 100 कोटी भारतीयांना होऊ शकतो कोरोना?
 • सावधान ! कोरोना वेगाने पसरतोय?
 • नीति आयोगाचा इशारा

कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसतेय. याचा परिणाम सर्वांवर दिसून येतोय. त्यामुळे आता अधिक  सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हळू हळू अनलॉकचा टप्पा सुरु होतोय. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणार गर्दी होईल. आणि याचाच परिणाम म्हणजे कोरोना फोफावेल. त्यामुळे या परिस्थिती काय करयचं हा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. 

सावधान. आता तरी खबरदारी बाळगा. आणि कोरोना रोखण्यासाठी काळजी घ्या. कारणय येत्या काही दिवसांत कोरोना भयानक रुप घेऊ शकतो. कोरोना संसर्ग वेगाने पसरू शकतो असा इशाराच नीति आयोगाकडून देण्यात आलाय. एक दोन कोटी नव्हे तर तब्बल 100 कोटी भारतीयांना कोरोना होऊ शकतो.

हेही वाचा -

कोरोनाचं घातक रूप आता महाराष्ट्रात? पुणे, सातारा, नाशिकमध्ये धोका वाढला?

इतक्या भयंकर वेगानं कोरोनाचा प्रसार होणार असल्याचं नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर पॉलनं म्हटलंय. भारतातील तब्बल 85 टक्के लोकांना कोरोना होण्याची भीती वर्तवण्यात आलीय. म्हणजे प्रत्येकाच्या घरात कोरोना इंट्री घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं काळजी घेणं हाच कोरोनापासून सुटकेचा एकमेव उपाय आहे. पण, नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर वी. के. पॉल यांनी काय इशारा दिलाय वाचा -

 • एका व्यक्तीपासून 5 व्यक्ती, 5 व्यक्तींपासून 50 जणांना होऊ शकतो कोरोना
 • 100 कोटी भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते
 • 15 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला असावा किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी
 • लस येईपर्यंत कोरोनापासून बचावासाठी काळजी घ्यावी लागेल
 • मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं
   
 • लस येईपर्यंत एवढी काळजी घ्यावीच लागेल. नाहीतर कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला तर 100 कोटी लोकांना कोरोना होऊ शकतो. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल तर सावधगिरी बाळगा.


संबंधित बातम्या

Saam TV Live