महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजातील जातपंचायती रद्द करा - प्रा लक्ष्मण हाके

सागर आव्हाड
बुधवार, 19 मे 2021

सांगली Sangli जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नंदिवाले समाजातील काही कुटुंबे वाळीत टाकण्याची घटना नुकतीच घडली आहे, त्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा लक्ष्मण हाके यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे. ​

पुणे - सांगली Sangli जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नंदिवाले समाजातील काही कुटुंबे वाळीत टाकण्याची घटना नुकतीच घडली आहे, त्या पार्श्वभूमीवर ओबीसी OBC संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा लक्ष्मण हाके Lakshman Hake यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे. Cancel caste panchayats in different communities in Maharashtra

हे देखील पहा -

महाराष्ट्र Maharashtra हे पुरोगामी म्हणून ओळखले जाते. फुले Phule शाहू Shahu आंबेडकर Ambedkar यांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये आजही जातपंचायती मोठ्या प्रमाणात चालतात. सर्व कायदे धाब्यावर बसवून जातपंचायत आजही न्यायनिवाडा करते. जातपंचायतीने दिलेला निर्णय मान्यच करावा लागतो. अन्यथा जातपंचायत समाजातील आशा कुटुंबाला वाळीत टाकते. Cancel caste panchayats in different communities in Maharashtra

उल्हासनगरमध्ये रुग्णांना मिळणार कृत्रिम ऑक्सिजन

त्याला " वाळपत्र देण्याची शिक्षा " म्हणतात, ही शिक्षा म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. इथला गृहविभाग नक्की काय करतो असा प्रश्न पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने जातपंचायती सारख्या पर्यायी रूढी बंद व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला जाईल असे प्रा लक्ष्मण हाके म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live