VIDEO | एटीएममधून आता दोन हजारांची नोट येणार नाही?

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

तुम्हाला आता इंडियन बँकेच्या एटीएममधून दोन हजारांची नोट मिळणार नाही. कारण बँकेनेच एटीएममध्ये दोन हजारांची नोट न भरण्याचा निर्णय घेतलाय. 

एटीएममधून निघालेल्या दोन हजारांच्या नोटा सुट्टे करणं ग्राहकांची डोकेदुखी ठरलीय
असे ग्राहक त्याच दोन हजारांच्या नोटा घेऊन बँकेत येतायत. आणि दोन हजारांची नोट सुट्टी करण्यासाठी
बँकेत रांगा लागतायत. ही ग्राहकांची आणि बँकेची डोकेदुखी टाळण्यासाठी दोन हजारांच्या नोटा यापुढे इंडियन बँकेच्या एटीएममधून मिळणार नाहीत. त्याऐवजी दोनशेच्या नोटा एटीएममध्ये भरण्याकडे कल असेल.

इंडियन बँकेनं जरी असं म्हटलं असलं तरी असं करणं कायद्यात बसतं का?, हा निर्णय ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी आहे की बँकेच्या सोयीसाठी आहे? असे प्रश्न निर्माण होतायत.

दोन हजारांची नोट ग्राहकांची खरंच अडचण करत असेल तर बँकेच्या निर्णयाचं स्वागत करायला हवं, मात्र छोट्या रकमेच्या नोटा वागवणं ग्राहकांना जास्त त्रासदायक ठरलं तर मात्र बँकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

तूर्तास, इंडियन बँकेने हा निर्णय घेतलाय, मात्र इतरही बँकांनी हा निर्णय घेतला तर दोन हजारांची नोट बँकांतून आणि पर्यायाने बाजारातूनच गायब होतेय की काय अशी शक्यता निर्माण झालीय.

WebTittle ::  Can't get two thousand note from ATM now?

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live