वडिलांच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या 7 बहिणींना अखेर न्याय मिळाला

संजय तुमराम
बुधवार, 9 जून 2021

प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. मात्र, काही तासातच गेल्या १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला.

समाजातील एका कुटुंबाला क्षुल्लक कारणावरून बहिष्कृत करणाऱ्या गोंधळी जात पंचायतीच्या सात लोकांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रपूर शहरातील प्रकाश ओगले यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने बहिष्कार घातला होता. हा बहिष्कार मागील 15 वर्षांपासून आजतागायत कायम होता. यातच प्रकाश ओगले यांचा गत रविवारी मृत्यू झाल्यावर जात पंचायतीने त्यांच्या अंत्यसंस्काराला कुणीही जाऊ नये म्हणून त्यांच्या नातलगांना धमकी देत जातीतून बहिष्कृत करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ओगले यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी कुणीही आले नाही. शेवटी मृतक प्रकाश ओगले यांच्या 7 मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. (A case has been registered against 7 members of Gondhali caste panchayat)

सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने समुपदेशन केल्यावर प्रकाश ओगले यांच्या मुलाच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहरातील सिटी पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश वैराडकर (नागपूर), विनोद वैराडकर (नागपूर), सुरेश गंगावणे (यवतमाळ), प्रेम गंगावणे (यवतमाळ), मोहन ओगले (यवतमाळ), अशोक गंगावणे (बिलासपूर, छत्तीसगड) आणि कैलास वैराडकर (रायपूर, छत्तीसगढ) या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जात पंचायतीच्या नावावर चुकीच्या धारणा पाळल्या जात आहेत, हे या प्रकरणावरून दिसून आले.

हे देखील पाहा 

दरम्यान, जातपंचायतीच्या जाचामुळे सात बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली होती. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर Chandrapur शहरात घडला आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथे ही घटना घडली होती. या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झाले आहे.

उरवडे येथील आग प्रकरणात कंपनी मालक निकुंज शाह यास 13 जून पर्यंत पोलीस कोठडी... 

प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. मात्र, काही तासातच गेल्या १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा Caste Panchayat बहिष्कार पुन्हा एकदा आड आला. गोंधळी समाजामधील प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पदरी ७ मुली आणि २ मुलं. त्यामुळे त्यांना समाजातील लग्न-समारंभ, सामाजिक कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live