डॉक्टरांची बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल विरुद्ध गुन्हा दाखल

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 5 मे 2021

कोरोना काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्‍या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता सुनिल पाल यांनी डॉक्टरांविषयी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य तसेच टिका करण्यात आली आहे.

मुंबई -  कोरोना Corona  काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्‍या डॉक्टरांची Doctor बदनामी करणारे व्हिडीओ Video व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल Sunil Pal याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस Andheri Police Station ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता सुनिल पाल यांनी डॉक्टरांविषयी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य तसेच टिका करण्यात आली आहे. A case has been registered against comedian Sunil Pal for defaming a doctor

एका चॅनेल्सशी संवाद साधताना त्यांनी एका व्हिडीओमध्ये डॉक्टर Doctor शैतानाच्या वेशात फिरत आहेत, कोरोनाच्या नावाने डॉक्टरांकडून गरीबांना घाबरविले जात आहे.

हे देखील पहा -

हॉस्पिटलमध्ये बेड, औषध, प्लाझमा नाही असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. गरीब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल याची पुरेपुरे काळजी घेतली जात आहे असे वक्तव्य व्हिडिओत केले होते. A case has been registered against comedian Sunil Pal for defaming a doctor

सर्वोच्च न्यायालयाने केले ऑक्सिजन व्यवस्थापनाच्या 'मुंबई मॉडेल'चे कौतुक

या प्रकरणी एका डाँक्टरांच्या संघटनेकडून दाखल केलेल्या अर्जानुसार अंधेरी Andheri  पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीसठी  सुनील पालला बोलावले जाऊ शकते.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live