अवाजवी बिल घेणाऱ्या चाकणमधील रुग्णालयावर गुन्हा दाखल 

गोपाल मोटघरे
सोमवार, 31 मे 2021

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक नंदा ढवळे यांच्या तक्रारी वरून चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना साथीच्या (Coronavirus) काळात अवाजवी बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली होती. राजेश टोपे यांच्या घोषणे नंतर पुणे जिल्ह्यात पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथिल चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A case has been registered against a hospital in Chakan for taking Noisy bills)

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक नंदा ढवळे यांच्या तक्रारी वरून चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये मयत विजय लक्ष्मण पोखरकर याच्यावर उपचार करण्यात आले होते. पोखरकर यांच्या उपचारासाठी  चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलने शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून 2 लाख 53 हजारांची रक्कम उकळली.

हे देखील पाहा

आरोग्य विभागाकडून वारंवार सांगूनही अवाजवी रक्कम परत न केल्या प्रकरणी चाकण क्रीटीकेअर हॉस्पिटल विरुध्द चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश घाटकर, डॉ.स्मिता घाटकर, डॉ.राहुल सोनवणे आणि डॉ.सीमा गवळी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live