पानगावात 48 लाखांचा वाळूसाठा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विविध ठिकाणी 687 ब्रास वाळूचा साठा करण्यात आला होता.

वृत्तसंस्था :  सोलापूर Solapur जिल्ह्यातील पानगाव PanGaon येथे अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विविध ठिकाणी 687 ब्रास वाळूचा साठा करण्यात आला होता.  त्याचे मूल्य तब्बल 48 लाख 9 हजार रुपये इतके आहे. तर  पर्यावरणाची पायमल्ली केल्याप्रकरणी तलाठ्यांच्या फिर्यादीवरुन तिघांवर बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुनील शेरखाने  यांनी दिली आहे. ( A case has been registered against three persons in Pangaon for confiscating sand worth Rs 48 lakh) 

अंकुश भिसे, धनाजी मोरे, हनुमंत तिखांडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नाव आहेत. पुढील अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live