नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र हाय कोर्टाकडून रद्द; खासदारकी अडचणीत.. 

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 8 जून 2021

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का बसला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केले आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हे निकाल दिले आहे

मुंबई : अमरावतीच्या Amravati खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का बसला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र Certificate मुंबई Mumbai उच्च न्यायालयानं High Court रद्द केले आहे. न्यायमूर्ती Justice बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हे निकाल दिले आहे. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक Lok Sabha elections जिंकली होती. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्र विरोधात, शिवसेनेचे Shivsena नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले असता. अडसूळांच्या याचिकेवर  मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिल आहे. Caste certificate of Navneet Kaur Rana canceled by High Court

आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निकाल सुनावण्यात आले. बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं कौर यांनी जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. याशिवाय, त्यांना २ लाखांचा दंड Penalty देखील ठोठावला आहे. २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली गेली, तेच प्रमाणपत्र आता रद्द झाल्यानं राणा यांची खासदारकी MP अडचणीत आली आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल

मुंबई उच्च न्यायालयानं राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. राणा यांच्याच शब्दांत सांगायचं झाल तर दूध का दूध आणि पानी का पानी झालं आहे, असा टोला शिवसेना नेते अडसूळ यांनी लगावल आहे. राणा यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली आहे. घटनेच्या चौकटीत हा गुन्हा आहे. यामुळे राणा यांना तुरुंगावास देखील घडू शकेलं. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असं अडसूळ म्हणाले आहेत. Caste certificate of Navneet Kaur Rana canceled by High Court

हे देखील पहा 

२०१३ मध्ये नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाले. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवले. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्र विरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केल. त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवले होते. याच जात प्रमाणपत्राच्या आधारावर राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live