लातूर: दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन युवकांना पकडले 

दीपक क्षीरसागर
गुरुवार, 27 मे 2021

पोलीसांची चाहुल लागताच दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले मात्र तिघांना घटनास्थळी पकडण्यात पोलीसांना यश आले.

लातूरातील सिध्देश्वर मंदिरा जवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले. या तिघांकडून एक तलवार, लोखंडी रॉड, मिरची पावडर जप्त करण्यात आले. लातुर शहरातील सिध्देश्वर मंदिरा जवळील कपाऊंड जवळ पाचजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर उपअधिक्षक यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी व गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. (Caught three young men preparing for a robbery)

पोलीसांची चाहुल लागताच दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले मात्र तिघांना घटनास्थळी पकडण्यात पोलीसांना यश आले. त्यात अजिंक्य निळकंठ मुळे, वय २४, रा. उत्का ता. औसा सध्या रा. जुना औसा रोड, विश्वजित अभिमन्यू देवकत्ते, वय २०, रा. कातपूर, गणेश महादेव माने, वय १९, रा. खोरे गल्ली यांचा समावेश आहे. अजिंक्य मुळे याच्याकडून तलवार, विश्वजित देवकत्ते याच्याकडून एक लोखंडी रॉड तर गणेश माने याच्याकडून मिरची पावडर जप्त करण्यात आली. पळून गेलेल्यांमध्ये सुनिल विठ्ठल भोसले रा. राजे शिवाजी नगर वसवाडी व निलेश काळे रा. शिरुर अनंतपाळ सध्या रा. खर्डेकर स्टॉप असल्याचे त्यांनी सांगितले.

 हे देखील पाहा

गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल भोसले व निलेश काळे या दोघांचा शोध घेत गेलेल्या पोलीसांच्या पथकास सुनिल भोसले हा चोरीच्या मोटारसायकलसह सापडला. लातूर शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस एरिया, दयानंद कॉलेज गेट, प्रकाश नगर येथे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याची कबुली त्याने दिली.


संबंधित बातम्या

Saam TV Live