VIDEO | सावधान... हिवाळ्यात कोरोना होणार आक्राळविक्राळ, जागतिक आरोग्य संघटनेचा खळबळजनक इशारा

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020
  • सावधान... हिवाळ्यात कोरोना होणार आक्राळविक्राळ
  • जागतिक आरोग्य संघटनेचा खळबळजनक इशारा
  • आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याच्याही सूचना

येत्या हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणखी वेगाने होणार असून वृद्धांसोबत तरुणांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. खुद्द WHOनं हा इशारा दिलाय. त्याचसोबत कोरोनामुळे मृत्यू होण्याचाही आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली गेलीय.

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत जगाचा कारभार सुरू आहे. कोरोनाग्रस्तांचे आकडेही वाढतच आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने धक्कादायक इशारा दिलाय. हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणखी वेगाने होणार असल्याचा चिंता वाढवणारा दावा WHOने केलाय.

हिवाळ्या कोरोनाचा मोठा प्रकोप
हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढेल असा इशारा WHO ने दिलाय. त्याचसोबत वृद्धांपेक्षा तरुणांना कोरोनाची लागण होण्याची भीती जास्त असणार आहे. त्यामुळे शाळा, मॉल्स आणि गर्दीची ठिकाणं सुरू करण्याबाबत फेरविचार करावा अशी सूचनाही WHO ने दिलीय.

कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडणं अजूनही शक्य झालेलं नाहीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक आहे.

मृतांचा आकडाही वाढताच
जगभरात कोरोनामुळे दिवसाला सुमारे 5 ते 6 हजार लोकांचा मृत्यू होत असून भारतात प्रत्येक दिवशी सुमारे 1000 लोकांचा बळी जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 350 लोकांचा तर मुंबईत 40 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय.

WHO ने हा इशारा देतानाच जागतिक कोरोना आणीबाणी जाहीर करण्याबाबत विचार सुरू असल्याचं सांगितलंय. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासह अनेक देशांत लसीची अंतिम चाचणी सुरूय. त्यातच WHOने दिलेला इशारा पाहता हिवाळ्याच्या आधीच लस उपलब्ध व्हायला हवी अशी अपेक्षा प्रत्येकजण करतोय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live