सावधान | हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 2 जुलै 2020

जुलै महिन्यात आठ दिवस समुद्राला उधाण येणार आहे. हवामान विभागाने जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तसंच समुद्राला भरती येणार असल्याचं लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भरतीवेळी लाटांची उंची साडेचार मीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

मुंबई: मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे.कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात आठ दिवस समुद्राला उधाण येणार आहे. हवामान विभागाने जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तसंच समुद्राला भरती येणार असल्याचं लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भरतीवेळी लाटांची उंची साडेचार मीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. समुद्रात साडेचार मीटरपेक्षा मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकाही सज्ज झाली आहे. 

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live