VIDEO | सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय तपासाला वेग, सुशांतचा लॅपटॉप, डायरी आणि मोबाईल मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सुपूर्द

साम टीव्ही
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांशी या प्रकऱणी बातचीत केली. यावेळी त्यांनी केलेल्या तपासाची सर्व माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिलीये. महाराष्ट्र केडरचे पोलिस अधिकारी सुवेझ हक हे राज्य सरकारच्या वतीने या टीमसोबत समन्वय साधत आहेत.

मुंबईत येताच सीबीआयचं पथक एक्शन मोडमध्ये दिसून आलंय. मुंबई पोलिसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणातील तपासाची सर्व कागदपत्र सीबीआयला सोपवली आहेत. आज सकाळीच सीबीआयचे अधिकारी वांद्रेतील पोलिस स्थानकात दाखल झाले होते.

त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांशी या प्रकऱणी बातचीत केली. यावेळी त्यांनी केलेल्या तपासाची सर्व माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिलीये. महाराष्ट्र केडरचे पोलिस अधिकारी सुवेझ हक हे राज्य सरकारच्या वतीने या टीमसोबत समन्वय साधत आहेत.

सुशांतचा लॅपटॉप, डायरी आणि मोबाईल मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे पुढील तपासासाठी सुपूर्द केलाय. दरम्यान, त्याआधी मुंबईतील सीबीआयच्या कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत नेमका कसा तपास केला जाणारे, याबाबतचा प्लान ठरवण्यात आल्याचं कळतंय. 
दरम्यान, तपास अधिकारी नेमके कोण आहेत, त्यावर एक नजर टाकुयात.

संबंधित बातम्या

Saam TV Live