सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी तपास अखेर सीबीआयकडे, अंकिता लोखंडेकडून ट्विट करत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत

साम टीव्ही
बुधवार, 19 ऑगस्ट 2020
  • सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी तपास सीबीआयकडे
  • सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
  • मुंबई पोलिसांनी CBI ला सहकार्य करावं - SC
  • सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
  • SCच्या निर्णयानंतर अंकिताचं ट्विट
  • 'न्याय हे कृतीमधील सत्य, सत्याचा विजय'
  • 'सुशांतला न्याय मिळण्याची ही पहिली पायरी'

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसलाय गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या तपासावरही विरोधकांनी शंका उपस्थित केली होती. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानं पुढे काय होतं, हे पाहणं महत्त्वाचंय. 

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं, सत्याचा विजय असं ट्विट करत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तीनं हे ट्विट करत न्यायदेवेतेचा फोटो ट्विट केलाय. तसंच सुशांतला न्याय मिळण्याची ही पहिली पायरी असल्याचा हॅश टॅग केलाय.

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत साम टीव्हीशी बोलताना काय म्हटलंय, आपण ऐकुयात..

दरम्यान संजय राऊतांनी यावर काय प्रतिक्रिया दिलीय ऐका -


संबंधित बातम्या

Saam TV Live