१०० कोटींच्या आरोपांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक मुंबईत

सूरज सावंत
मंगळवार, 6 एप्रिल 2021

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुखांवरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआय ऍक्शन मोडवर आली आहे. दिल्लीचे सीबीआय पथक आज मुंबईत या आरोपांच्या चौकशीसाठीआज मुंबईत दाखल झाले आहे

मुंबई : परमबीरसिंग प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआय (CBI) ऍक्शन मोडवर आली आहे. दिल्लीचे सीबीआय पथक आज मुंबईत या आरोपांच्या चौकशीसाठीआज मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहे. चौकशीला लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.  CBI team in Mumbai to probe allegations On Anil Deshmukh

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचार (Corruption) केल्याप्रकरणी आरोप केले होते.  

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत मात्र आता वाढ झाली आहे. प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळल्यास सीबीआय त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करु शकते, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. ही चौकशी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करायाची असल्याने हे येणारे पंधरा दिवस आता देशमुख यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत असे म्हणावे लागेल. 

राज्य सरकारने (State Government) बदली केल्यानंतर अस्वस्थ असलेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thakarey) ठाकरे यांना आपले  देशमुखांबाबत असलेले सर्व आरोप असलेले पत्र (Letter) लिहिले होते. प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुल करण्याचे लक्ष्य (Target) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) दिले होते, असा परमबीरसिंग यांचा आरोप होता. CBI team in Mumbai to probe allegations On Anil Deshmukh

त्यामुळे आता सीबीआय प्राथमिक चौकशीसाठी कुणाकुणाला बोलावणार याची उत्सुकता पूर्ण जनतेला तसेच राजकीय पक्षांत आहे. परमबीरसिंग तक्रारदार असल्याने त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांबाबत सखोल चौकशी होऊ शकते. सचिन वाझेचा देखील परमबीरसिंग यांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्या एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेकडेही होऊ शकते. तसेच ज्यांच्यावर हे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्या अनिल देशमुखांलाही सीबीआय चौकशीची सुई टोचू शकते.

Edited by-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live